लोकसत्ता टीम

वर्धा: मोकाट श्वानांचा त्रास ग्रामीण भागातही वाढत आहे. हिंगणघाट तालुक्यातील शिरुड या खेड्यात मोकाट श्वानांमुळे गावकरी त्रस्त आहेत.

चार श्वानांच्या टोळीने येथील निखिल उरकुडकर यांच्या जनावराच्या गोठ्यात हल्ला केला. त्यात कालवड बळी गेली असून गायीला गंभीर जखमा झाल्या आहेत. याच मोकाट श्वनांनी एक दिवसापूर्वी एका गायीचे लचके तोडले. काही तासांनी ती गाय दगावली.

आणखी वाचा- धक्कादायक! रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ७७ वर्षीय वृद्धेवर बलात्कार

पशुपालक शेतकऱ्यांनी या हानी बद्दल नुकसानभरपाईची मागणी शासनाकडे केली आहे. तसेच मोकाट श्वानांचा बंदोबस्त करण्याचा आग्रह धरला. पंधरा दिवसांपूर्वी सेलू येथे सुध्दा मोकाट श्वान एका कालवडीच्या जीवावर उठण्याची घटना घडली होती. गाव पातळीवर अशा मोकाट व हिंस्त्र झालेल्या श्वानांचा बंदोबस्त करण्याची भूमिकाच नसल्याने पाळीव जनावरांचे कसे करायचे, अशी चिंता सतावत आहे.