गोंदिया: केवळ गोंदिया शहरातच नाही तर गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण भागातही भटक्या श्वानाची दहशत गेल्या काही महिन्यांपासून इतकी वाढली आहे की ते सरळ मनुष्य, लहान मुलांवर प्राणघातक हल्ला करतात. गोंदिया वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाच्या नोंदीतील आकडेवारीनुसार, गोंदिया जिल्ह्यात गेल्या ८ महिन्यांत २ हजार १२५ जणांवर कुत्र्यांनी हल्ला करून त्यांना चावा घेतला आहे, तर काहीना नखांनी ओरबडले आहे. मिळालेली ही आकडेवारी श्वाना नी दंश केलाल्या नंतर शासकीय रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या जखमींची आहे. परंतु बहुतांश प्रकरणांमध्ये शहर परिसरातील रुग्ण वेळेवर उपचार मिळतो की नाही या भीती पोटी शासकीय रुग्णालयात जाण्याऐवजी खाजगी रुग्णालयात जातात. ग्रामीण लोक मात्र उपचारासाठी शासकीय रुग्णालयात जातात त्यामुळे श्वाना नी दंश केल्याचा हा आकडा जास्त ही असू शकतो असा अंदाज आहे.

गोंदिया जिल्ह्यात असे कोणतेही गाव किंवा शहर नाही, प्रत्येक वस्ती, गल्ल्या भटक्या आणि बेवारस कुत्र्यांनी भरलेल्या नाहीत. त्याचप्रमाणे पाळीव कुत्र्यांची संख्याही जास्त आहे. शहरातील मोठ्या चौकात आणि गल्लीबोळात ही भटक्या कुत्र्यांचे कळप दिसतात. काही चौकांमध्ये कुत्र्यांचे कळप इतके आक्रमक असल्याचे दिसून येते की ते दुचाकींसह पादचाऱ्यांवरही हल्ला करतात.

गोंदिया शहरात ही गेल्या काही दिवसांपासून श्वानदंश घटना सतत वाढत आहेत. यात काही उदाहरणे अशीही मिळाली की पाळीव असलेला कुत्रा आक्रमक झाला आणि घरातील कुणाला दंश झाल्यानंतर त्याला भटकंतीसाठी सोडले जाते. तर काही लोक म्हणतात की या बेवारस कुत्र्यांच्या आक्रमक होण्या मागे मांस दुकाने हे याचे मुख्य कारण आहे. गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने दिलेली आकडेवारी खूपच धक्कादायक आहे. जानेवारी २०२५ ते ऑगस्ट २०१५ या मागील ८ महिन्याच्या कालावधीत २ हजार १२५ लोकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याचे सांगण्यात आले आहे. ज्यांच्यावर जिल्ह्यातील विविध शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय अशा शासकीय आस्थापनात यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.

गोंदिया जिल्ह्यात जानेवारी २०२५ महिन्यात २९४ लोकांना श्वानदंश करण्यात आले आहे. याच प्रकारे फेब्रुवारीला २७३, मार्च महिन्यात २३९, एप्रिल महिन्यात २३४, मे २३०,जून ३०२, जुलै २६३ आणि ऑगस्ट महिन्यात २९० लोकांना श्वानदंश अशा प्रकारे मागील आठ महिन्यात २ हजार १२५ लोकांना श्वानदंश झाले आहे.

अडीच वर्षांच्या मुलीला श्वानदंश, प्रकृती स्थिर

गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यात रविवारी शाळेला सुटी असल्यामुळे आपल्या घरासमोर मित्रांसोबत खेळत असताना १४ सप्टेंबर रोजी ४-५ भटक्या कुत्र्यांच्या टोळीने आमगावला लागून असलेल्या शुभमनगर बनगाव येथील रहिवासी शिवम रहांगडाले यांची २ वर्षांची मुलगी तुवीक्षा रहांगडाले हिच्यावर हल्ला केला. श्वानदंश करण्यात आलेल्या मुलीला तात्काळ आमगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, तेथून प्राथमिक उपचारानंतर तिला पुढील उपचारांसाठी गोंदिया येथील केटीएस जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. मुलीची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. आमगाव शहरात ही रात्रंदिवस भटक्या कुत्र्यांचे टोळी रस्त्यावर फिरत असतात. परंतु वारंवार तक्रारी करूनही, आमगाव नगरपालिका प्रशासन याकडे लक्ष देत नाही.