नागपूर : इंस्टाग्रामवर चित्रफिती बनविणे आणि सतत भ्रमणध्वनीवर गेम खेळण्याची सवय असलेल्या १९ वर्षीय तरुणीला आईने रागावले. तरुणीने रागाच्या भरात चौथ्या माळ्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना कपीलनगरात घडली. स्नेहा पंकज शर्मा (१९, कडू लेआऊट) असे मृत मुलीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्नेहा ही पदवीचे शिक्षण घेत होती. तिचे वडील बांधकाम कंत्राटदार, आई गृहिणी असून तिला १० वर्षांचा भाऊ आहे. स्नेहा नेहमी इंस्टाग्रामवर ’रिल्स’ बनवत होती. तसेच गेम खेळण्याची तिला सवय होती. त्यामुळे पालक तिला नेहमी ओरडत होते. २८ एप्रिलला स्नेहा इंस्टाग्रामवर चित्रफीत बघत बसली होती. यादरम्यान आईने तिला काहीतरी काम सांगितले. तिने काम करण्यास नकार दिला. त्यामुळे आईने तिच्यावर आरडाओरड केली. ती रागाच्या भरात घरातून बाहेर पडली. दीक्षितनगरातील चार माळ्यांच्या इमारतीवर चढली व उडी घेऊन आत्महत्या केली.

हेही वाचा – वर्धा : डोक्यात राग ठासून, पण थंड डोक्याने केली लहाण्याने मोठ्याची हत्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकरणी कपीलनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. स्नेहाने आठवीत असतानासुद्धा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.