हनुमाननगरातील माहेश्वरी मँथ क्लासेसचा संचालक असलेल्या शिक्षकाने एका विद्यार्थिनीशी गणिताचा सराव घेण्याच्या बहाण्याने अश्लील चाळे केले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी शिक्षकाला अटक केली. न्यायालयाने आरोपी शिक्षकाची कारागृहात रवानगी केली. अरविंद सत्यनारायण माहेश्वरी (५२, रा. जोशीवाडी,अजनी) असे अटकेतील शिक्षकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १५ वर्षीय मुलगी नवव्या वर्गाची विद्यार्थिनी आहे. तिला गणितात कमी गुण मिळत असल्यामुळे शिकवणीत घातले. गेल्या काही दिवसांपासून माहेश्वरीची वाईट नजर विद्यार्थिनीवर होती. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मुलीला अतिरिक्त सराव घेण्यासाठी थांबवले व बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. आईने मुलीसह अजनी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी त्याला अटक केली. न्यायालयाने त्या आरोपी शिक्षकाची मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली.