नागपूर : अटकेतील आरोपीचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्यानंतर ‘कस्टोडिअल डेथ’ प्रकरणात कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैदी पोलीस अधिकाऱ्याचा आकस्मिक मृत्यू झाला. यशवंत मोकाजी कराडे (मानवनगर, टेकानाका) असे मृत्यू पावलेल्या कैद्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यशवंत कराडे हे १९९४ ला सहायक पोलीस निरीक्षक असताना त्यांनी आरोपीला एका गुन्ह्यात अटक केली होती. त्या गुन्ह्यात पोलीस कोठडीत असताना आरोपीला जबर मारहाण केली होती. त्या मारहाणीत अटकेतील आरोपीचा मृत्यू झाला होता. त्या प्रकरणात ठाणेदारासह ७ जणांवर ‘कस्टोडिअल डेथ’चा गुन्हा दाखल झाला. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते.

हेही वाचा – अमरावती: दप्तराचे ओझे कमी, मात्र पालकांना दरवाढीचा भुर्दंड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ७ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ७ वर्षांची शिक्षा सुनावली. यशवंत कराडे हे २०१८ पासून मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होते. १७ जूनला त्यांची अचानक प्रकृती बिघडली होती. त्यांच्यावर मेयोमध्ये उपचार सुरू होता. मात्र, उपचारादरम्यान यशवंत यांचा २४ जूनला मृत्यू झाला. या प्रकरणी धंतोली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.