भंडारा : सातत्याने चर्चेत राहत असलेल्या दि भंडारा अर्बन बँक भंडाऱ्याच्या ६ संचालकांनी गुरुवार, १३ एप्रिल रोजी राजीनामा देत सहकार क्षेत्रात वादळ निर्माण केले आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी दोन संचालकांनी राजीनामा दिला होता तर चार संचालक अपात्र घोषित करण्यात आले होते. राजीनाम्यामुळे १९ पैकी १२ संचालकांनी बँकेवर तात्काळ प्रशासक नियुक्त करावा अशी मागणी विभागीय उपनिबंधकांकडे केली आहे.

सहा संचालकांच्या कधीकाळी सहकार क्षेत्रात आपले वेगळे अस्तित्व निर्माण करणारी दि भंडारा अर्बन बँक सध्या या ना त्या कारणाने चर्चेत येत आहे. काही दिवसांपूर्वी बँकेचे संचालक विलास काटेखाये आणि चिंतामण मेहर यांनी राजीनामे दिले होते. त्यानंतर एका संचालकाच्या तक्रारीवरून बँकेच्या उपविधीत नमूद तरतुदींचा भंग केल्याच्या कारणावरून रामदास शहारे, पप्पू गिरेपुंजे, श्रीमती बावनकर, जयंत वैरागडे यांचे सदस्यत्व रद्द झाले होते.

हेही वाचा – खासदार अरविंद सावंत यांच्या समोरच ठाकरे गटाचे दोन गट उघड; एका गटासोबत बैठक तर दुसरा बाहेर

दरम्यान, आज हिरालाल बांगडकर, गोपीचंद थवानी, लीलाधर वाडीभस्मे, सांगितले. कविता लांजेवार, महेश जैन आणि उदय मोगलेवार या ६ संचालकांनी आपला राजीनामा बँकेचे अध्यक्ष नाना पंचबुधे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मदान यांच्याडे सोपविला. मागील तीन वर्षांत बँक तोट्यात असतानाही आणि रिझर्व्ह बँकेचे निर्देश असतानाही खर्चावर निर्बंध अनागोंदी कारभार करीत मोठा नफा दाखवून त्यावर भरल्या गेलेल्या इन्कम टॅक्स परत मिळवण्यासाठी सनदी लेखापालाला ८० लाखांच्या घरात शुल्क देण्यात आले. या सर्व गोष्टींचा विरोध असतानाही हा प्रकार केल्याने राजीनामा दिल्याचे हिरालाल बांगडकर यांनी राजीनामा दिल्यानंतर सर्व सहा संचालकांनी नागपूर येथे जाऊन विभागीय उपनिबंधकांची भेट घेतली.

हेही वाचा – देशातील ओबीसींसह सर्व जातींची जनगणना होणे गरजेचे; प्रख्यात वक्ते डॉ. लक्ष्मण यादव यांचे मत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सद्यस्थितीत १९ संचालक संख्या असलेल्या बँकेच्या संचालक मंडळात १२ रिक्त असल्याने संचालक मंडळ अल्पमतात आले असून त्या ठिकाणी प्रशासक बसविण्यात यावा अशी मागणी केल्याचे बांगडकर यांनी स्पष्ट केले. अचानक ६ संचालकांच्या राजीनाम्यामुळे सहकार क्षेत्रात चर्चेला ऊत आला असून कधी काही चांगल्या कामांसाठी चर्चेत राहणारी बँक आता अशा पद्धतीने चर्चिली जात असल्याने ग्राहकांचाही विश्वास उडू लागला आहे.