चंद्रपूर : छत्रपती शिवाजी महाराजांची लंडन येथे असलेली वाघनखे आणण्याचा विडा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उचलला आहे. वाघनखे आणण्यात नक्की यश मिळेल. आपल्या सर्वांचे स्वप्न सुधीर मुनगंटीवार पूर्ण करतील हा विश्वास आहे या शब्दांत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.

सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार १ ऑक्टोंबर रोजी लंडन येथे वाघनखे आणण्यासाठी जात आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी या वाघनखांनी अफजल खान याचा कोथळा बाहेर काढला होता. ही वाघनखे राज्यातील लोकांना दर्शनासाठी ठेवली जाणार आहेत. राज्यात एक मोठा कार्यक्रमदेखील आयोजीला जाणार आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनाची तयारी सुरू असतानाच मुख्यमंत्री शिंदे यांनी मुनगंटीवार यांच्या कर्यशेलीचे कौतुक केले आहे.

हेही वाचा – चंद्रपूर : आठ तास अभ्यास, आठ तास झोप, मित्रांसोबत गप्पा आणि..; पोलीस अधीक्षक परदेशी आणि विद्यार्थ्यांमध्ये रंगल्या आयएएस होण्याच्या गप्पा

हेही वाचा – गोंदिया : पांगोली नदीच्या पाणी पातळीत वाढ, तिसऱ्या दिवशीही गोंदिया-आमगाव मार्ग बंदच

सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या टीमचे कौतुक करतो. जेव्हापासून त्यांनी सांस्कृतिक विभागाचा कार्यभार हाती घेतला आहे, तेव्हापासून एकापेक्षा एक वरचढ कार्यक्रम होत आहेत. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची लंडन येथे असलेली वाघनखे आणण्याचा विडा उचललेला आहे. आपल्या सरकारला वाघनखे आणण्यास नक्की यश मिळेल, आपल्या सगळ्यांचे स्वप्न पूर्ण होईल, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.