नागपूर : अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी दुपारी बारा वाजता उघडकीस आली. प्रज्ज्वल विलास शंभरकर (२०, नवेगाव, ता. भीवापूर) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.

हेही वाचा – नागपूर : जरीपटक्यातील क्रिकेट बुकीवर छापा, ‘युवराज’ला चौकशीविना सोडल्याने संशय

हेही वाचा – नागपूर : तब्बल वीस लाखांचा पुतळा, ६७ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रज्ज्वल हा विहिरगावातील सूर्योदय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा द्वितीय वर्षाचा विद्यार्थी होता. तो शताब्दीनगर चौकात भाड्याने राहत होता. गेल्या काही दिवसांपासून तो तणावात वावरत होता. त्याने सोमवारी दुपारी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचा मित्र घरी आल्यानंतर तो दार उघडत नसल्यामुळे त्याने खिडकीतून डोकावून बघितले. त्याला प्रज्वल हा गळफास घेतलेल्या स्थितीत दिसला. या प्रकरणी अजनी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.