अमरावती : अकोल्‍याहून बडनेराच्या दिशेने येणाऱ्या मालगाडीसमोर युवक-युवतीने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. मृत तरुणीची ओळख पटली असून युवकाची ओळख अद्याप पटलेली नाही.

राधा देवीदास पवार (वय २०, रा. कोकर्डा) असे मृत युवतीचे नाव आहे. अकोल्याहून बडनेराकडे मालगाडी येत असताना दुर्गापूर गावानजीक रेल्‍वेखाली युवक-युवतीने आत्‍महत्‍या केल्याची माहिती इंजिनचालकाने रेल्‍वे पोलिसांना दिली. जीआरपी आणि बडनेरा पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता दोघांचे मृतदेह रेल्‍वे रुळाजवळ पडले होते.

हेही वाचा – नागपूर : एटीएममधून निघाल्या चक्क पाचशेच्या बनावट नोटा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तरुणीच्‍या जवळील आधारकार्ड तसेच महत्त्वाच्या कागदपत्रांवरून तिचे नाव कळले. पोलिसांनी तिच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांना घटनेची माहिती दिली. युवतीचा चुलतभाऊ बडनेरा ठाण्यात पोहोचला आणि त्याने युवतीची ओळख पटविली. रात्री ती घरी होती, परंतु मंगळवारी सकाळी कुठे गेली, याबाबत माहिती नसल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी युवकाची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.