संघाची सर्वसमावेशक भूमिका वैदिक हिंदू राष्ट्र निर्माणाचा 'अजेंडा'; विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांची टीका | Sukhdev Thorat criticism that the inclusive role of the Sangh is the Agenda of Vedic Hindu Rashtra Nirman dag 87 amy 95 | Loksatta

संघाची सर्वसमावेशक भूमिका वैदिक हिंदू राष्ट्र निर्माणाचा ‘अजेंडा’; विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांची टीका

बहुजन समाजामध्ये काही वर्ग असा आहे ज्याचा हिंदूंच्या विचारांवर विश्वास आहे. त्यांना हा धर्म सर्वसमावेशक वाटतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक हे ओळखून आहेत.

sukhdev thorat
डॉ. सुखदेव थोरात

बहुजन समाजामध्ये काही वर्ग असा आहे ज्याचा हिंदूंच्या विचारांवर विश्वास आहे. त्यांना हा धर्म सर्वसमावेशक वाटतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक हे ओळखून आहेत. त्यामुळे यांच्या भरवशावर ते हिंदू राष्ट्र बनवण्याची स्वप्न पाहत आहेत. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी संविधानाला मानतो, असे एका कार्यक्रमात सांगितले. ही गोष्ट स्वागतार्ह असली तरी सर्वसमावेशक हिंदू धर्माच्या आड त्यांना वैदिक हिंदू राष्ट्र हवे आहे, असे प्रतिपादन विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी केले.

हेही वाचा >>>‘एमपीएससी’ भरतीमध्ये जाचक अटींचा विद्यार्थ्यांना फटका! विभागनिहाय गुणवत्ता यादीमुळे मुख्य परीक्षेला मुकण्याची शक्यता

समाज कल्याण विभाग आणि समाजिक व आर्थिक समता संघ यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. सुखदेव थोरात लिखित ‘वंचितांचे वर्तमान’ या ग्रंथावर परिचर्चा आयोजित करण्यात आली होती. यावेळी तीन सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. शेवटच्या सत्रात ‘हिंदुत्ववाद : वर्तमान परिस्थितीच्या संदर्भात’ या विषयावर डॉ. थोरात बोलत होते. ते म्हणाले की, हिंदुत्वाची संकल्पना ही सावरकरांनी मांडली. तशी ती अनेकांनी मांडली आहे. मात्र, हिंदू राष्ट्राची संकल्पना करताना संघाला नेमकी कुणाची भूमिका मान्य आहे, असा प्रश्न डॉ. थोरात यांनी उपस्थित केला. डॉ. मोहन भागवत यांनी एका कार्यक्रमात त्यांची भूमिका मांडताना भारतीय संविधानाचे समर्थन केले. तसेच प्रास्ताविकेचे वाचनही केले. ही बाब स्वागतार्ह आहे. हिंदुत्वावर भाष्य करताना तो कसा सर्वसमावेशक आहे हे संघाकडून वारंवार सांगितले जाते. हिंदुत्वाची वैचारिक पातळी किती मोठी आहे हेही सांगितले जाते. याच आधारावर ते बहुजनांना आम्ही कसे सर्वसमावेशक आहोत, असे सांगत असले तरी त्यांची हिंदू राष्ट्राची संकल्पना ही वैदिक हिंदुत्वाची असल्याची टीकाही थोरात यांनी केली. यावेळी दुपारी झालेल्या चर्चांमध्ये डॉ. श्रीनिवास खांदेवाले, डॉ. जोगेंद्र गवई, डॉ. शैलेंद्र लेंडे आदींनी मार्गदर्शन केले.

हेही वाचा >>>अपघातप्रवण स्थळे दुरुस्तीसाठी राज्याला ११२ कोटी रुपये; सुरक्षित प्रवासासाठी केंद्रीय रस्ते महामार्ग मंत्रालयाचा प्रयत्न

ख्रिश्चन, मुस्लिमांबाबत काय?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जैन, शीख आणि बौद्ध यांना हिंदू धर्माचा भाग मानतात. तर दुसरीकडे ख्रिश्चन आणि मुस्लिमांना आपले मानत नाहीत. ही सर्वसमावेशक भूमिका राहू शकत नाही. वैदिक हिंदू धर्मानुसार मनुष्याला विष्णूने निर्माण केले आहे. त्यामुळे विविध धार्मिक कार्यातून देवाची सेवा करावी, आत्मा आणि पुनर्जन्म अशा अनेक गोष्टी त्यामध्ये सांगण्यात आल्या आहेत. त्यामुळे असा धर्म सर्वसमावेश कसा, असा प्रश्नही थोरात यांनी केला.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 09:31 IST
Next Story
नागपूर: देशात लोकशाही आहे असे म्हणणे बाळबोधपणा; सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी यांचे मत