बुलढाणा : मागील पंधरवाड्यापासून रिक्त असलेल्या पोलीस अधीक्षकपदी नागपूर लोहमार्ग पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांची नियुक्ती झाली आहे.
हेही वाचा – वाशीम : नवरी प्रियकरासह मंडपातून पळाली अन् नवरदेव रिकाम्या हाताने परतला
तत्कालीन पोलीस अधीक्षक सारंग आव्हाड यांची पुणे येथे उपमहानिरीक्षकपदी पदोन्नतीने बदली झाली होती. मागील २० ऑक्टोबर रोजी येथे रुजू झालेले आव्हाड यांच्या बदलीचे आदेश मागील २५ एप्रिल रोजी निर्गमित झाले. मात्र त्यांच्या जागी कुणाचीही नियुक्ती न झाल्याने हे महत्त्वाचे पद पंधरा दिवसांपासून रिक्त होते. अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी पदाचा प्रभार सांभाळला.