scorecardresearch

Premium

अमरावती: स्वाभिमानी शेतकरी संघटनेने फेकला विभागीय आयुक्तालयात कापूस

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजीही केली.

swabhimani farmers association threw cotton premises divisional commissioner office amravati
अमरावती: स्वाभिमानी शेतकरी संघटनेने फेकला विभागीय आयुक्तालयात कापूस (छायाचित्र- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता टीम

अमरावती: सध्या बाजारात कापसाचे दर घसरले असून शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळेच हे संकट उद्भवले असून सरकारने कापसाला तेरा हजार रुपये हमीभाव जाहीर करावा अशी मागणी करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या आवारात कापूस फेकला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजीही केली.

youths against contracting of government jobs
सरकारी नोकरीच्या कंत्राटीकरणाविरोधात हजारो तरुण रस्त्यावर
atul save visit rss office
ओबीसी खात्याच्या मंत्र्यांची अचानक संघ कार्यालयाला भेट, आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असताना…
Former corporator son suicide nagpur
नागपूर : माजी नगरसेवकाच्या मुलाची आत्महत्या, पोलीस ठाण्याला नागरिकांचा घेराव
rotten betel nuts seized in nagpur, nagpur rotten betel nuts
धक्कादायक! नागपुरात २.६० कोटींची सडकी सुपारी जप्त… प्रकरण काय पहा…

कॉटन लॉबीच्या दबावात सरकार झुकल्याने कापसाचे भाव पाडल्या गेले. सध्या मिळणाऱ्या सात हजारांपर्यंतच्या भावात उत्पादन खर्च निघणे कठीण असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला. मागच्या हंगामात अतिवृष्टी व सततच्या पावसाने कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यामुळे सरासरी उत्पादनात कमी आलेली आहे. अशा परिस्थितीत भाव पाडल्याने शेतकरी अडचणीत आलेले आहेत.

हेही वाचा… Health Special: हवामान बदलाचा आरोग्यावर परिणाम, डॉक्टरांचे म्हणने काय?

दरवाढीच्या प्रतीक्षेत अनेक शेतकऱ्यांचा कापूस अद्यापही घरीच पडून आहे. त्यामुळे कापसाला गतवर्षीप्रमाणे १३ हजार रुपयांचा भाव देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमित अढाऊ व प्रवीण मोहोड यांनी केली. यावेळी शासनाचा निषेध करीत घोषणा देण्यात आल्या. आंदोलनात संघटनेचे पदाधिकारी सहभागी होते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Swabhimani farmers association threw cotton in the premises of the divisional commissioners office in amravati mma 73 dvr

First published on: 06-06-2023 at 17:12 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×