खासगी शिक्षण संस्थेत गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक म्हणून कार्यरत असलेले शिक्षक कैलास इंगोले यांनी २० मार्च रोजी रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी संस्थाचालक आणि मुख्याध्यापक यांच्या विरोधात गुन्हे दाखल असून अद्यापही त्यांच्यावर कुठलीच कारवाई करण्यात न आल्याने नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

हेही वाचा >>>वाशीम:‘समृद्धी’वर पुन्हा अपघात; चालकाला आली डुलकी अन् रुग्णवाहिका ट्रकला धडकली, पाच जखमी

जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, त्या शिक्षण संस्थाचालक, मुख्याध्यापक व दोषीवर खंडणीचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी व संस्थेतील गैरप्रकाराची चौकशी करून संस्थेवर प्रशासक नेमावा. समता नगर येथील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढून विविध मागण्याचे निवेदन दिले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते रवी पट्टेबहादूर, सोनू इंगोले, सुमित कांबळे यांच्यासह नागरिकांची मोठी उपस्थिती होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.