वर्धा : देवळी तालुक्यातील नवजीवन आश्रमशाळेतील चिमुरड्या मुलींवरील ओढवलेल्या अश्लील प्रकारची दखल घेत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज चौकशीस प्रारंभ केला. महिला नायब तहसीलदार तसेच आदिवासी प्रकल्प अधिकारी यांची चमू नेमली. हे अधिकारी आश्रमशाळेत भेट देत विचारपूस करणार. त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करतील. त्यानंतर कारवाईस सुरवात होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – “दिव्यांगांसाठीच्या उपक्रमात येण्यास नेते अनुत्सुक”, बच्चू कडूंनी व्यक्त केली खंत, म्हणाले…

हेही वाचा – एसटी बँकेला रिझर्व बँकेचा दणका; निर्णयांना स्थगिती देत दोन लाखांचा दंड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच या प्रकरणात एफआयआर दाखल करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. लोकसत्ताने हे प्रकरण उजेडात आणल्यानंतर विविध नेत्यांनी यात लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. खासदार रामदास तडस यांनी ही बाब आदिवासी मंत्र्यांकडे उपस्थित करणार असल्याचे सांगितले. आदिवासी नेते अवचितराव सयाम हे प्रत्यक्ष भेट देणार आहे. या आश्रमशाळेतील पाचव्या वर्गातील मुलींशी एका कर्मचाऱ्याने अश्लील चाळे केल्याची तक्रार येथीलच अधिक्षिकेने देवळी पोलिसांकडे केली, हे विशेष.