लोकसत्ता टीम

गोंदिया : विदर्भामध्ये मोठा शिक्षक भरती घोटाळा समोर आला आहे. शासनाच्या बगलबच्च्यांना अनेक शाळा, कॉलेज या लोकांना व त्यांच्या कुटुंबीयांना फायदा देण्यासाठी देण्यात आल्या आहे.

आता हा घोटाळा प्रशासनावर ढकलत आहे. मात्र, तेवढेच शासनकर्ते देखील यात दोषी आहेत त्याच्यामुळे यांची चौकशी ही एसआयटी मार्फतच नव्हे तर हायकोर्टाच्या न्यायाधीशांमार्फत करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार पटोले यांनी केली आहे. ते गोंदिया जिल्हा काँग्रेस द्वारे तिरोडा येथे आयोजित काँग्रेस कार्यकर्ता मेळावा आणि पक्ष प्रवेश कार्यक्रमात रविवारी आले असता माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ते बोलत होते.

आमदार नाना पटोले म्हणाले, पुढील काळात यांच्या सरकारचे असे अनेको घोटाळे बाहेर येणार आहेत. एका प्रश्नाच्या उत्तरात शेतकरी कर्ज माफीवर आमदार नाना पटोले म्हणाले की पुढील काळात शेतकरी या सरकारला यांची जागा दाखवल्याशिवाय सोडणार नाही, सरकारच्या घोषणांमुळे, पापामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत.

धान उत्पादक शेतकऱ्यांना शासनाकडून २९ हजार रुपये हेक्टरी बोनस देण्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र या सरकार स्थापन व्हायला आता चार महिन्यांचा कालावधी उलटून देखील शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप बोनस जमा झालेलं नाही. निवडणूक काळात मतांचा जोगवा मागत असताना, जनतेची दिशाभूल करायची आणि सत्तेत आल्यानंतर त्यांच्या जखमेवर मीठ चोळायचं म्हणून ही सरकार शेतकरी विरोधी सरकार असून शेतकरी यांना यांची जागा दाखवल्याशिवाय सोडणार नाही अशी प्रतिक्रिया पटोले यांनी दिली.

दरम्यान, माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या काँग्रेस सोडून भाजप प्रवेश बद्दल विचारले असता नाना पटोले म्हणाले की ज्या पक्षाने तुम्हाला तुमच्या कुटुंबाला नावारूपास आणले त्या पक्षावर आरोप करायचे नसतात. पटोले यांनी संग्राम थोपटे यांना सल्ला देत म्हणाले की संग्राम थोपटे जिकडे जाण्याचे बघत आहेत तिकडे फार अंधार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काँग्रेस पक्षाने तुम्हाला मोठा केलं नावारूपाला आणलं हे काय कमी आहे की आज तुम्ही पक्ष सोडून जातानाही या पक्षावर टीका करत आहात असेही पटोले संग्राम थोपटे यांना उद्देशून म्हणाले. या प्रसंगी गोंदिया भंडाराचे खासदार प्रशांत पडोळे, माजी आमदार दिलीप बनसोड, राधेलाल पटले आदि उपस्थित होते.