scorecardresearch

Premium

१ डिसेंबरपासून तहसीलदारांचे काम बंद, दाखले मिळण्‍यात अडचणींची शक्‍यता

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतरही ‘ग्रेड पे’ ची अंमलबजावणी न केल्याच्या निषेधार्थ अमरावतीसह राज्यभरातील तहसीलदार, नायब तहसीलदारांनी येत्‍या १ डिसेंबरपासून काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Tehsildars warned of strike
१ डिसेंबरपासून तहसीलदारांचे काम बंद, दाखले मिळण्‍यात अडचणींची शक्‍यता (image – pixabay/representational image)

अमरावती : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतरही ‘ग्रेड पे’ ची अंमलबजावणी न केल्याच्या निषेधार्थ अमरावतीसह राज्यभरातील तहसीलदार, नायब तहसीलदारांनी येत्‍या १ डिसेंबरपासून काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेचे राज्याध्यक्ष सुरेश बगळे आणि महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष लक्ष्मण नरमवार तसेच संघटनेच्या इतर पदाधिकाऱ्यांनी हा इशारा दिला आहे.

राज्यभरातील तहसीलदार व नायब तहसीलदार यांनी विविध मागण्यांसाठी यापूर्वी ३ मार्चला बेमुदत कामबंद संप पुकारला होता. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तहसीलदार संघटनेची मागणी मान्य करत स्वाक्षरी करून राजपत्रित वर्ग २ यांचे ग्रेड पे ४,८०० रुपये वाढवण्याच्या प्रस्तावास मंजुरी दिली होती. मात्र अपर मुख्य सचिव यांनी अद्याप अंमलबजावणी केली नसल्याचा आरोप तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटनेने केला आहे. महसूल खात्यातील तहसीलदार, नायब तहसीलदार यांच्यावर वेळोवेळी अतिरिक्त जबाबदाऱ्या टाकून त्यांना वेगवेगळी कामे सांगितली जातात. त्यानुसार ती केलीही जातात. परंतु पगार वाढीच्या बाबतीत मात्र दिरंगाई केली जात आहे. त्यामुळेच नाईलाजाने आम्ही काम बंद आंदोलनाचा निर्णय घेतला, असे तहसीलदार, नायब तहसीलदारांच्या संघटनेचे म्हणणे आहे. दरम्यान या आंदोलनात सर्व पदाधिकारी, सदस्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

kitchen jugaad stick bindi paper on gas cylinder
Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
maratha community marathi news, economically backward marathi news
मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या मागास म्हणता येणार नाही- उच्च न्यायालय
Eknath shinde devendra fadnavis 2
“शिवसेना भाजपाच्या दावणीला बांधलेली नाही”, लोकसभेच्या ‘त्या’ फॉर्म्युलावर शिंदे गट आक्रमक; म्हणाले, “आमच्याबरोबर दगाफटका…”
rohit pawar, baramati, lok sabha, supriya sule, sunetra pawar, ajit pawar, sharad pawar, maharashtra politics,
बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार नव्हे, ‘यांच्या’त होणार लढत, रोहित पवार यांचे मोठे विधान

दाखले मिळण्‍यात अडचणी

या बेमुदत कामबंद आंदोलनामुळे शेतकरी आणि शालेय विद्यार्थ्यांना शासकीय दाखल्यांपासून वंचित राहावे लागण्याची शक्यता वर्तवण्‍यात आहे. त्याचबरोबर ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाला देखील फटका बसणार आहे. आंदोलनामुळे नागरिकांना शासकीय दाखले मिळवण्यासाठी ताटकळत राहावे लागणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tehsildars and naib tehsildars across maharashtra have warned of strike action from december 1 mma 73 ssb

First published on: 28-11-2023 at 13:43 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×