नागपूर:  विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागपूर येथे सुरू होणार आहे. यासाठी तात्पुरत्या स्वरुपात लिपीक-टंकलेखकाची एकूण १०  आणि शिपाई / संदेश वाहकांची २४ पदे  भरण्यात येणार आहे. लिपीक-टंकलेखक पदाकरिता शैक्षणिक अर्हता १२ वी उत्तीर्ण, मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. व संगणकाची एमएससीआयटी किंवा इतर समकक्ष संगणक परीक्षा उत्तीर्ण. 

हेही वाचा >>> चंद्रपूर : आमदार प्रतिभा धानोरकरांचा इशारा, कृषिपंपांना २४ तास थ्री फेज वीजपुरवठा न केल्यास…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वयाची अट खुल्या संवर्गासाठी १८ ते ३८ वर्षे आणि मागास वर्गासाठी १८ ते ४३ वर्षे (5 वर्ष नियमाप्रमाणे शिथीलक्षम), अशी आहे. शिपाई/ संदेश वाहकासाठी शैक्षणिक अर्हता ४ था वर्ग उत्तीर्ण किंवा उच्च अर्हता. वयाची अट खुला संवर्गासाठी वय वर्षे १८ ते ३८ तर मागास वर्गासाठी १८ ते ४३ (5 वर्षे नियमाप्रमाणे शिथीलक्षम) वर्ष तसेच सायकल चालविता येणे आवश्यक आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी  ५ नोव्हेंबरपर्यंत सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत क्र.२, दुसरा माळा, सिव्हील लाईन्स, नागपूर ४४०००१ (दूरध्वनी 0712-2531213) येथे अर्ज द्यावे. उमेदवारांनी कार्यालयात अर्जाचा नमुना घेण्यासाठी येताना सोबत फोटो तसेच इतर शैक्षणिक व आवश्यक कागदपत्रे सोबत आणावी. अर्जाचा विहित नमुना सदर कार्यालयात विनामुल्य उपलब्ध आहे.