नागपूर : संजय व्याघ्र प्रकल्पातील जैवविविधता समृद्ध करण्याच्या दिशेने मध्यप्रदेश वनखात्याने भारतीय वन्यजीव संस्थेच्या सहकार्याने एक महत्त्वाची कामगिरी पार पाडली. कान्हा व्याघ्रप्रकल्पातून दहा रानगव्यांना जेरबंद करून त्यांना संजय व्याघ्र प्रकल्पात स्थलांतरित करण्यात आले.

रानगवा म्हणजे जंगलातील सर्वात मोठी वन्यजीव प्रजाती आणि जंगलाचे पर्यावरणीय संतुलन राखण्यात त्यांची महत्त्वाची कामगिरी आहे. रानगव्याच्या स्थलांतरणाची ही प्रक्रिया अतिशय काळजीपूर्वक आखून कार्यान्वित करण्यात आली. मध्यप्रदेश वनखात्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक जे. एस. चौहान यांच्या मार्गदर्शनात भारतीय वन्यजीव संस्थेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. पराग निगम यांनी हा प्रकल्प हाताळला.

हेही वाचा – वाशीम : खासदार संजय राऊत यांच्या निषेधार्थ शिंदे गटाकडून जोडे मारो आंदोलन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रानगव्याचे संजय व्याघ्रप्रकल्पात सुरक्षितरित्या स्थलांतरण केले. या प्रकल्पात कर्नाटक, छत्तीसगड वनखात्याचे अधिकारी सहभागी होते. रानगवा हा गवताळ प्रदेश व्यवस्थापित करण्यास आणि जंगलातील लँडस्केपला आकार देण्यास मदत करतात. यामुळे संजय व्याघ्रप्रकल्पात रानगव्यांची संख्या वाढेल, अशी अपेक्षा आहे. कान्हा व्याघ्रप्रकल्पातून ३५ तर सातपुडा व्याघ्र प्रकल्पातून १५ अशा ५० रानगव्यांना संजय व्याघ्रप्रकल्पात स्थलांतरित करण्यात येणार आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात दहा रानगव्यांचे यशस्वी स्थलांतर करण्यात आले.