बुलढाणा जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवरील हल्ल्यांची मालिका कायमच आहे. नुकतेच चिखलीत ठाकरे गटाच्या उपजिल्हा प्रमुख कपिल खेडेकर (चिखली) यांच्या वाहनाची एका अज्ञात महिलेकडून तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. ही तोडफोडीची घटना सीसीटिव्हीत कैद झाली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा- प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची पत्नीने केली हत्या; मृतदेह विहिरीत टाकून…

vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
chhota rajan marathi news, 213 burglary marathi news
कुख्यात डॉन छोटा राजनच्या घरासह, २१३ घरफोड्या करणाऱ्यास अटक
Rape of accused wife
चंद्रपूर : रक्षक नव्हे राक्षसच! पोलीस हवालदाराचा आरोपीच्या पत्नीवर बलात्कार; पोलीस प्रशासनात खळबळ
Nagpur Central Jail, Notorious Gangster, Chetan Hazare , Assaulted by Inmate, crime news, police,
धक्कादायक! मध्यवर्ती कारागृहात टोळीयुद्ध, टिनाच्या पत्र्याने प्राणघातक हल्ला

खेडेकर यांच्या निवासस्थान परिसरात उभ्या असलेल्या त्यांच्या ‘स्कॉर्पिओ’ वाहनाची तोडफोड करण्यात आल्याचे आज, सोमवारी आढळून आले. यामुळे खेडेकर यांचे समर्थक मोठ्या संख्येने त्यांच्या निवासस्थानी जमा झाले. ‘सीसीटीव्ही’ फुटेजवरून रविवारी रात्री १२ वा. च्या सुमारास वाहनाची तोडफोड करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. तोंडाला स्कार्फ बांधलेली एक महिला तेथे आली, तिने आजुबाजूला बघितले आणि वाहनाची व शिवसेनेच्या ‘लोगो’ ची तोडफोड केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये महिलेचे हे कृत्य कैद झाले आहे. यानंतर खेडेकर यांनी चिखली पोलिसांत याबाबत तक्रार नोंदवली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

हेही वाचा- ‘छत्रपती शिवाजी महाराज कुणबी समाजाचे होते, त्यांनी…’; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वादग्रस्त वक्तव्य

खेडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीवरून आलेल्या एका इसमाने सीसीटीव्हीच्या रेंज बाहेर वाहन थांबवले. नंतर त्यावरून उतरलेल्या महिलेने वाहनाची तोडफोड केली. पोलीस तपास करणारच आहे, मात्र महिलेच्या आडून हा भ्याड प्रकार करणाऱ्यास आम्ही शोधून काढू, असा इशारा खेडेकर यानी दिला. उल्लेखनीय आहे की, यापूर्वी ऑगस्ट महिन्यात ठाकरे गटाचा बुलढाणा बाजार समितीत आयोजित कार्यक्रम शिंदे गटाने उधळून लावला होता. नोव्हेंबर महिन्यात मोताळा तालुक्यातील २ युवा पदाधिकाऱ्यांवर सशस्त्र हल्ला करण्यात आला होता. आता चिखलीत वाहनाची तोडफोड करण्यात आली आहे.