वर्धा : वर्धेचे खासदार तसेच यावेळी पुन्हा लोकसभा निवडणूक लढणारे भाजप उमेदवार रामदास तडस यांचा फोनवरील संवाद चर्चेत आला आहे.पारडा येथील प्रवीण महाजन यांनी तडस यांच्यासोबत बोलतांना त्यांना शेतकरी प्रश्नावर प्रश्न विचारण्यात आले. या चर्चेची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. सरकार शेतमालाची आयात करून देशातील मालाचे भाव पाडत आहे.

https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/03/A-conversation-between-Praveen-Mahajan-and-Ramdas-Tadas-4.mp3
(पारडा येथील प्रवीण महाजन यांनी रामदास तडस यांच्यासोबत बोलतांना त्यांना शेतकरी प्रश्नावर प्रश्न विचारण्यात आले. या चर्चेची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.)

त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडत आहे. तेंव्हा याबद्दल जाब का विचारात नाही, असे विचारले असता उत्तर देतांना तडस म्हणतात की हे प्रश्न विरोधकांनी उपस्थित केले पाहिजे. पण आता विरोधकाच राहिले नाही.महाजन त्यानंतर विचारतात की मग तुम्हीच का प्रश्न करीत नाही. यावर तडस म्हणतात की विचारले तर मंत्री घरी बसा म्हणतात. यावर महाजन आश्चर्य व्यक्त करतात. या क्लिप वर बोलतांना ते म्हणाले की ही बनावट व जुनी क्लिप आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The audio clip of praveen mahajan and mp ramdas tadsan conversation on the farmer issue has gone viral wardha pmd 64 amy
First published on: 26-03-2024 at 18:19 IST