बुलढाणा: खामगाव तालुक्यातील ढोरपगाव नजीकच्या नाल्याला काल बुधवारी आलेल्या पुरात वाहून गेलेल्या १४ वर्षीय बालकाचा मृतदेह आज आढळून आला. यामुळे ढोरपगाव परिसरात शोककळा पसरली आहे.
तालुक्यात अनेक ठिकाणी काल मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे लहान नदी, नाल्यांना पूर आला. यादरम्यान खामगाव तालुक्यातील ढोरपगाव येथील नाल्याला काल संध्याकाळी पूर आला. पुरात गावातीलच १४ वर्षीय जय विठ्ठल तायडे हा वाहून गेला होता. त्याचा गावकऱ्यांनी त्याचा शोध घेतला असता तो आढळून आला नाही.
हेही वाचा… ‘मुलांनो, जंकफूड नको तृणधान्य खा आणि शक्तिमान बना’; मिलेट मिशनचा सूर
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
दरम्यान, आज सकाळी नाल्याच्या काठी झुडपामध्ये जय याचा मृतदेह आढळून आला आहे. याची माहिती मिळताच नातेवाईक व गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी महिलांनी एकच आकांत केला.