मध्य चंदा वनविभाग वनपरिक्षेत्र धाबा अंतर्गत येणाऱ्या सुकवाशी डोंगरगाव जंगलात वाघीण आणि बछड्याचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. या घटनेने वनविभागात खळबळ उडाली आहे. दरम्यान वाघिणीच्या इतर बछड्यांचा शोध वनविभाग घेत आहे. ही घटना सुकवाशी वन क्षेत्रातील कक्ष क्रमांक १६३ व १६१ मध्ये घडली.शुक्रवारी एका बछडाच्या मृतदेह १६१ मध्ये आढळून आला होता.

हेही वाचा >>>बुलढाणा: निवडणूक विभागात कार्यरत शिपायाची आत्महत्या; कारण अस्पष्ट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर वनविभागाने आज शोधमोहीम राबवली असता कक्ष क्रमांक १६३ मध्ये वाघिणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा करून दोन्ही वाघांना अग्नी दिला. वाघ आणि बछड्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. या वाघिणीला पुन्हा काही बछडे होते काय, याचा शोध वनविभाग घेत आहे. दरम्यान, एका बछड्याला चंद्रपूर येथे हलविण्यात आले होते. त्याचाही मृत्यू झाला, असे सांगण्यात येत आहे.