बुलढाणा: नांदुरा येथे करण्यात आलेल्या अज्ञात युवकाच्या खून प्रकरणाचा उलगडा झाला असून यातून धक्कादायक कारण बाहेर आले आहे. या युवकाचा त्याच्या तिघा घनिष्ठ मित्रांनी पैशांच्या कारणावरून खून केल्याचे निष्पन्न झाले.

नांदुरा तालुक्यातील लोणवडी शिवारात एका युवकाचा मृतदेह आढळला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे
देण्यात आला. पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांनी तपास पथक नेमले. या पथकाने तपास करीत तिघा आरोपींना ताब्यात घेतले. या घटनेतील मृताची ओळख पटली असून हर्षल उर्फ सदाशिव घोपे (३२, रा. घाटपुरी ता. खामगाव) असे त्याचे नाव आहे. पैशांच्या व्यवहारावरून झालेल्या वादापायी बत्तीस वर्षीय हर्षलची हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले.

हेही वाचा – ‘बर्ड फ्लू’ग्रस्त कोंबड्यांच्या सतत संपर्कात, अखेर कर्मचाऱ्यांचीच…

हेही वाचा – खासदार प्रफुल पटेल म्हणतात, “भंडारा-गोंदिया लोकसभेच्या जागेवर दावेदारी सोडली नाही”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पथकाने तिघा मारेकऱ्यांना ६ मार्चच्या रात्री ताब्यात घेतले आहे. आकाश उर्फ आदिनाथ रावणकर (रा. घाटपुरी ता खामगाव), रुपेश कुरवाडे (रा. शेगाव), मयूर शेलार (रा.वाडी ता खामगाव) अशी आरोपीची नावे आहेत. त्यांनी खुनात वापरलेली टाटा इंडिका कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.