अल्‍पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या एका मजनूने तिचा पाठलाग सुरू केला. ती बसस्‍थानकावर पोहचताच तो तिच्‍या पुढ्यात उभा ठाकला. मी तुझ्यावर प्रेम करतो, तू फक्‍त हो म्‍हण, दोघांसाठी रेल्‍वेचा डबा बुक केला आहे, असा दावा त्‍याने केला. या प्रसंगानंतर ती मुलगी घाबरली. तिने आरडाओरड करताच लोक जमा झाले. त्‍यांनी या मजनूला चांगलाच चोप दिला.

हेही वाचा >>>VIDEO:धावती रेल्वेगाडी पकडण्याच्या नादात महिला पडली, मग मुलीनेही धावत्या गाडीतून उडी मारली; दैव बलवत्तर म्हणून…

दर्यापूर येथील बसस्‍थानकावर ही घटना घडली. पोलिसांनी पीडित १७ वर्षीय मुलीच्‍या तक्रारीवरून दत्‍ता सीताराम कलाने (रा. दर्यापूर) याच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे. दर्यापूर तालुक्‍यातील एका गावात राहणारी ही अल्‍पवयीन मुलगी संगणक प्रशिक्षणासाठी दररोज दर्यापूरला ये-जा करते. प्रशिक्षण वर्गाला उपस्थित राहून ती गावी परत जाण्‍यासाठी बस स्‍थानकावर पोहचली. तेव्‍हा तिच्‍यासमोर आरोपी युवक आला. आपण रेल्‍वेने पळून जाऊ, मी रिझर्वेशन केले आहे. दोघांसाठी डबा बुक केला आहे. तुझा मोबाईल क्रमांक दे, असे त्‍याने या मुलीला सांगितले. या घटनेने पीडित मुलगी घाबरली. तिने आरडाओरड केल्‍यानंतर बसस्‍थानकावरील लोक धावले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एक तरूण या मुलीची छेड काढत आल्‍याचे लक्षात येताच उपस्थितांनी या तरूणाला चांगलाच चोप दिला. लोकांनीच त्‍याला पकडून पोलीस ठाण्‍यात नेले. नंतर या मुलीचे पालकही पोलीस ठाण्‍यात पोहचले. पोलिसांनी आरोपीच्‍या विरोधात विनयभंग आणि पोक्‍सो अंतर्गत गुन्‍हा दाखल केला आहे.