scorecardresearch

वेळ देऊन निघून जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांना परत बोलवा… भंडाऱ्यात नागरिकांचा रास्तारोको

सकाळपासून अनेक संघटनांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, लाभार्थी मुख्यमंत्र्यांच्या भेटीस्थळी पोहोचले होते. मात्र कार्यक्रम संपताच मुख्यमंत्र्यांचा ताफा कुणालाही न भेटता निघून गेल्याने नागरिक संतापले आणि त्यांनी राष्ट्रीय महामार्ग सहावर रास्ता रोको सुरू केले.

CM convoy Bhandara
वेळ देऊन निघून जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांना परत बोलवा… भंडाऱ्यात नागरिकांचा रास्तारोको (छायाचित्र – लोकसत्ता टीम/ग्राफिक्स)

भंडारा : शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी भंडारा जिल्ह्यात येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना विविध संघटना आणि लाभार्थ्यांनी निवेदन देण्यासाठी वेळ मागितली होती. त्यांना वेळ देण्यातही आली होती. त्यासाठी सकाळपासून अनेक संघटनांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, लाभार्थी मुख्यमंत्र्यांच्या भेटीस्थळी पोहोचले होते. मात्र कार्यक्रम संपताच मुख्यमंत्र्यांचा ताफा कुणालाही न भेटता निघून गेल्याने नागरिक संतापले आणि त्यांनी राष्ट्रीय महामार्ग सहावर रास्ता रोको सुरू केले.

हेही वाचा – नाना पटोले म्हणतात, “मोदी जेथे जातात तेथे पराभव अटळ, भारतीय संघ जिंकला असता तर…”

Dhananjay-Munde-13
पीक विमा भरपाई दिवाळीपूर्वी देण्याचा प्रयत्न – धनंजय मुंडे
atul save visit rss office
ओबीसी खात्याच्या मंत्र्यांची अचानक संघ कार्यालयाला भेट, आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असताना…
sudhir-mungantiwar
“संजय गांधी निराधार योजनेचा निधी तत्काळ वितरित करा,” वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांना भावनिक साद
mohit kamboj ajit pawar
अजित पवार आजही भाजप नेत्यांना अमान्य? मोहित कंबोज यांच्या समाजमाध्यमातील संदेशावरुन वाद

हेही वाचा – अकोला : काँग्रेसमध्ये नाराजी, जिल्हा कार्यकारिणीच्या उपाध्यक्षांचा राजीनामा

वेळ देऊन निघून जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांना परत बोलवा, जोवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना परत बोलवाणार नाही तोवर महामार्गावरून हटणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. दरम्यान, रस्त्या अडवल्याने महामार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The cm convoy left without meeting anyone road block on national highway 6 in bhandara ksn 82 ssb

First published on: 20-11-2023 at 17:21 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×