scorecardresearch

Premium

पेपरफुटीचे सत्र सुरूच; देवेंद्र फडणवीस मंत्री असलेल्या विभागाचाच पेपर फुटला…

महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनीचा पेपर फुटला, असा दावा स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केला आहे. फुटलेला पेपर आमच्याकडे आहे असेही समितीने सांगितले आहे. त्यामुळे राज्यात पेपरफुटीचे सत्र सुरूच आहे.

Maharashtra State Power Generation Company
पेपरफुटीचे सत्र सुरूच; देवेंद्र फडणवीस मंत्री असलेल्या विभागाचाच पेपर फुटला… (प्रातिनिधिक छायाचित्र)

नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री असलेल्या खात्याचा पुन्हा एकदा पेपर फुटला आहे. ते गृहमंत्री आहेत तर मुंबई पोलीस भरतीचा पेपर फुटला होता. त्यांच्याकडे ऊर्जाचे खाते आहे तर आता महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनीचा पेपर फुटला, असा दावा स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केला आहे. फुटलेला पेपर आमच्याकडे आहे असेही समितीने सांगितले आहे. त्यामुळे राज्यात पेपरफुटीचे सत्र सुरूच आहे.

स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने एक्सवर माहिती दिली असून अनेक आरोप केले आहेत. विधिमंडळात आपण खोटे बोलला होतात, आता हे मान्य करा उपमुख्यमंत्री साहेब आणि राजीनामा द्या. तुम्हाला पेपर नीट घेता येत नाहीत मग महाराष्ट्राचे कसे होणार असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

mpsc
लोकसेवा आयोगातच बाह्य यंत्रणेद्वारे भरती; एक वर्षांसाठी काल्पनिक पदनिर्मितीस मंजुरी
जलसंधारण अधिकारी परीक्षेचा पेपर फुटला, विभागाच्या अधिकाऱ्यानेच प्रश्नपत्रिका फोडली!
Anger among ST employees
भविष्य निर्वाह निधी, ग्रॅज्युईटीचा भरणा न केल्याने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये रोष
maharashtra s first woman battalion marathi news, maharashtra first woman battalion marathi news
गृहमंत्रालयाचे नकारात्मक धोरण मूळावर, पहिल्या महिला बटालियनची राज्याला अद्यापही प्रतीक्षा

हेही वाचा – अंमली पदार्थांच्या तस्करीचीही ‘समृद्धी’! मेहकरनजीक समृद्धी महामार्गावर ४३ किलो गांजा जप्त

हेही वाचा – बुलढाणा : भाजपा नेत्याच्या वाहनाला भरधाव एसटीची धडक; एअर बॅग उघडल्याने…

महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनीच्या विविध पदांसाठी परीक्षा घेण्यात आली होती, त्याचा निकालही जाहीर झाला. आयबीपीएसनी ही परीक्षा घेतली होती. समितीने सांगितले की, याबाबत १३ ऑगस्टला पेपर फुटल्याचे सांगितले होते. काही मुलांची नावेसुद्धा दिली होती. त्याचबरोबर मुख्यमंत्री कार्यालयाला निवेदन दिले होते. मात्र काहीच चौकशी केली नाही. आज आम्हाला पुरावा सापडला आहे. आता तरी या सर्व प्रकरणाची चौकशी करा आणि लवकरात लवकर पेपरफुटीवर कायदा निर्माण करा. नाहीतर फडणवीस साहेब राजीनामा द्या, अशी मागणी केली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The competitive examination coordination committee has claimed that the paper of maharashtra state power generation company was leaked dag 87 ssb

First published on: 07-10-2023 at 14:40 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×