वर्धा: ग्रामीण भागात लहान व मोठा पोळा आजही मोठ्या उत्साहात साजरा केल्या जातो. नवी पिढी शेतीपासून दुरावत चालली असतांनाच उत्सवात मात्र डिजेची धूम ठोकत ताल धरतात. पण बैलांच्या घटत्या संख्येबाबत कोणी बोलत नाही. आज पोळ्यास ही चिंतेची बाब अधिक प्रकर्षाने पुढे येते. गतवर्षी तीस हजार बैलजोड्या असल्याची पशू संवर्धन विभागाची नोंद आहे. आता ती २७ हजारावर घसरली आहे.

शेतकऱ्यांचा खरा सखा असणाऱ्या बैलास पोसण्याचा खर्च आता सहन होत नसल्याचे शेतकरी सांगतात. दुसरी बाब म्हणजे बैलजोडी व शेतमजूर यावर खर्च करण्यापेक्षा यंत्राद्वारे शेतीची विविध कामे करणे अधिक सोयीचे ठरत आहे. परवडेल अशा दरात ही यंत्रे दारात उभी राहतात.

हेही वाचा… सायबर गुन्हेगार सक्रिय; ‘रेकॉर्डेड कॉल’वरून फसवणूक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चार दिवसाचे काम एका दिवसात आटोपते, अशी प्रतिक्रिया संजय पिल्लेवार या शेतकऱ्याने दिली. तर पशुपालन खाते बैलांची संख्या रोडावत असल्यास दुजोरा देते.