scorecardresearch

नागपूर : देश २०७० पर्यंत कार्बनमुक्त करणार – नितीन गडकरी

२०७० पर्यंत देश कार्बनमुक्त करणार, असा संकल्प केंद्रीय रस्ते विकास व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी ‘सी-२०’ परिषदेच्या समारोप प्रसंगी केला.

nitin gadkari
नागपूर : देश २०७० पर्यंत कार्बनमुक्त करणार – नितीन गडकरी

नागपूर : पेट्रोल व धावणाऱ्या वाहनामुळे प्रदुषणात वाढ होत असल्याने त्याला पर्यावरणपूरक इंधनाचा (ग्रीन फ्युअल) पर्याय देत २०७० पर्यंत देश कार्बनमुक्त करणार, असा संकल्प केंद्रीय रस्ते विकास व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी ‘सी-२०’ परिषदेच्या समारोप प्रसंगी केला व हा संकल्प पूर्ण करण्यासाठी ‘सी-२०’ परिषदेतील मंथनाचा उपयोग होईल, असे गडकरी म्हणाले.

सोमवारपासून सुरू झालेल्या ‘जी-२०’ अंतर्गत ‘सी-२०’ परिषदेत विविध विषयांवर देश-विदेशातील प्रतिनिधींनी पर्यावरण, गरिबी आणि इतरही समस्यांवर मंथन केले. मंगळवारी सायंकाळी झालेल्या समारोपाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ‘सी-२०’ समितीच्या अध्यक्ष माता अमृतानंदमयी, यांच्यासह केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाचे सहसचिव अभय ठाकूर, रामभाऊ म्हाळगी प्रबोधनीचे उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, कन्याकुमारीच्या विवेकानंद केंद्राच्या निवेदिता भिडे, विजय नंबियार यांच्यासह इतरही मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

हेही वाचा >>> खासगी बसमध्येही तिकीट दरात महिलांना पन्नास टक्के सूट!

गडकरी म्हणाले, भारत आता जीवाश्म इंधनाच्या पर्यायी स्त्रोतांकडे हरित इंधनाकडे वाटचाल करत आहे. ‘बायो-इथेनॉल’ विविध स्त्रोतांपासून तयार केले जात आहे. सर्वाधिक प्रदूषण हे पेट्रोलवर धावणाऱ्या वाहनांपासून होत असल्याने पर्यायी इंधनाचा वापर करण्यावर भर दिला असून ‘इथेनॉल’वर चालणारी, बॅटरीवर चालणारी, विजेवर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन दिले जात आहे.

हेही वाचा >>> नागपूर : पत्नीने शारीरिक संबंधास नकार दिला, चिडलेल्या पतीने…

२०७० पर्यत देश कार्बन मुक्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे, भारतीय संदर्भात ‘अंत्योदय’ म्हणजे समाजातील शेवटच्या व्यक्तीचा उदय आणि विकास आपल्याला सुनिश्चित करायचा आहे. नैतिकता, अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि पर्यावरण हे समाजाचे तीन स्तंभ आहेत, असे गडकरी म्हणाले. निवेदिता भिडे म्हणाल्या, प्रथमच ‘सी-२०’ प्रक्रिया अध्यात्मावर आधारित आहे. भारत हा अध्यात्माचा देश आहे. आपण एकतेवर कार्य करण्याचा प्रयत्न करतो. परिषद एका महत्त्वाच्या टप्प्यातून पार पडली आहे. डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी आभार मानले.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-03-2023 at 09:41 IST

संबंधित बातम्या