नागपूर: शासकीय विज्ञान संस्थेला दुबळे करण्याचा प्रकार! ; जिल्हा प्रशासनाकडून उपेक्षा | The district administration is starting the work of weakening the famous government science institute in Central India amy 95 | Loksatta

नागपूर: शासकीय विज्ञान संस्थेला दुबळे करण्याचा प्रकार! ; जिल्हा प्रशासनाकडून उपेक्षा

कर्मचाऱ्यांअभावी प्रयोगशाळा बंद

नागपूर: शासकीय विज्ञान संस्थेला दुबळे करण्याचा प्रकार! ; जिल्हा प्रशासनाकडून उपेक्षा
मध्य भारतातील नामवंत शासकीय विज्ञान संस्थेला दुबळे करण्याचे काम जिल्हा प्रशासनाकडून सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

मध्य भारतातील नामवंत शासकीय विज्ञान संस्थेला दुबळे करण्याचे काम जिल्हा प्रशासनाकडून सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. संस्थेमध्ये आधीच कर्मचाऱ्यांची वानवा असताना येथील तृतीय आणि काही चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना ‘बीएलओ’ कामांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावण्यात आल्याने प्रयोगशाळा बंद पडल्या आहेत. कर्मचाऱ्यांअभावी विद्यार्थ्यांना प्रयोगासाठी आवश्यक असलेले उपकरण आणि साहित्य मिळत नसून आता प्राध्यापकांना कारकुनी कामे करावी लागत आहेत.

हेही वाचा >>> सूरजागड लोहखाणीतून होणाऱ्या जडवाहतुकीसाठी ‘माइनिंग कॉरिडॉर’ – पालकमंत्री फडणवीस

शासकीय विज्ञान संस्था ही मध्य भारतातील एक नामवंत संस्था आहे. मात्र, मागील काही वर्षांत संस्थेचा आलेख उतरत आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या देशभरातील संस्थांच्या क्रमवारीतही शासकीय विज्ञान संस्थेची कामगिरी आधीच्या तुलनेत घसरली आहे. काही दिवसांआधीच ग्रंथालय आणि वसतिगृहाची दुरवस्था समोर आली होती. लाखो रुपये खर्चून तयार करण्यात आलेले प्रशस्त ग्रंथालय कर्मचाऱ्यांअभावी बंद पडून होते. आता पुन्हा येथील कर्मचाऱ्यांना ‘बीएलओ’ कामांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावण्यात आले आहे. शासकीय विज्ञान संस्थेतील जवळपास बारा ते पंधरा कर्मचारी तेथे सेवा देत आहेत. यातील बहूतांश कर्मचारी हे प्रयोगशाळेत काम करणारे होते. आता कर्मचारीच नसल्याचे प्रयोगशाळा बंद पडल्या आहेत. विज्ञान संस्थेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रयोगशाळाच मिळत नसेत तर त्यांनी प्रात्यक्षिक ज्ञान कसे घ्यावे, हा प्रश्न उपस्थित होत आहे. कर्मचारी नसल्याने अनेकदा प्राध्यापकांना सकाळी येऊन प्रयोगशाळा उघडावी लागते. मात्र, येथील साहित्य आणि उपकरणांची माहिती त्यांना नसते. प्राध्यापकांवर अध्यापन सोडून कारकुनी कामे करण्याची वेळ आली आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
चंद्रपूर : अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी नागपुरातील महिला सूत्रधाराला अटक; तीन दिवसांची पोलीस कोठडी

संबंधित बातम्या

“अजित पवारांनी उंचीचा विचार करून बोलावं”; राज्यपालांबाबत केलेल्या ‘त्या’ विधानावरून चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया
भंडाऱ्यात रानटी हत्तींची घुसखोरी; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
भंडारा: ‘द बर्निंग ट्रक’; लाखनी उड्डाणपुलावरील थरार
नागपूर : ‘पदवी आयुर्वेदाची असेल तर उपचार ॲलोपॅथीचे नको’; नितीन गडकरींचा डॉक्टरांना सल्ला
बदल्यांवरून राज्यातील पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये खदखद, कारणे कोणती?

व्हिडिओ

ताज्या बातम्या
शेतकऱ्याचा नादच खुळा! शेतात आलेल्या सिंहिंणींना दिलं जशाच तसं उत्तर, Viral Video पाहून म्हणाल ‘कमाल है’
सुपरस्टार चिरंजीवी यांनी चित्रपट महोत्सवात चाहत्यांना दिलं मोठं वचन; म्हणाले “मी चित्रपटसृष्टी…”
पुणे शहरात रिक्षा बंद, प्रवाशांचे हाल; मागणी पूर्ण होईपर्यंत बंद सुरू ठेवण्याचा निर्धार
आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डींच्या बहिणीला तेलंगणात अटक, गाड्यांचीही जाळपोळ; काय आहे प्रकरण?
निधीअभावी पुणे जिल्हा परिषदेच्या अत्याधुनिक अभिलेख कक्षाचे काम रखडले