नागपूर : शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अंबाझरी तलावातून पाण्याचा मोठा विसर्ग झाला. पूरपरिस्थिती निर्माण होऊन पाचजणांचे बळी गेले आणि कोट्यवधींचे नुकसान झाले. सोमवारपर्यंत पूरग्रस्त सावरले नव्हते. सध्या पूर ओसरला असला तरी पूरग्रस्तांच्या वेदना मात्र कायम आहेत. या स्थितीला जबाबदार कोण यावरून सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

हेही वाचा – श्शु… ‘टायगर जिंदा हैं!’ नव्या ‘टायगर’च्या आगमनाने गावात सामसूम; दहशत अशी की…

हेही वाचा – अंत्ययात्रेत आले अन तिरडी सोडून नातेवाईकांनी नदीत मारल्या उड्या! जाणून घ्या नेमके काय घडले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पूरग्रस्त वस्त्यांचा सोमवारी फेरफटका मारला असता येथील नागरिक अद्याप पुराच्या धक्क्यातून सावरलेले नसल्याचे दिसून आले. पुराचे पाणी घरांमध्ये शिरल्याने इलेक्ट्रिक वस्तू, सोफा सेट, गादी, वस्रे खराब झाली होती. चारचाकी, दुचाकी नादुरुस्त झाल्या होत्या. अनेकांनी त्यांच्या कारवर गादी वाळत टाकली होती. बहुतांश घरात चिखल, माती साचली होती. ती स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासंदर्भात अंबाझरी लेआऊटमधील एका उपाहारगृहाचे संचालक शुभम म्हणाले की, त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये पाच फूट पाणी साचले होते. सर्व वस्तू खराब झाल्या आहेत. कॉफी बनवण्याची साडेतीन लाख रुपयांची मशीन निकामी झाली आहे. याशिवाय फ्रीज आणि इतर वस्तूही खराब झाल्या आहेत.