गडचिराेली: दोन दिवसांपूर्वी चातगाव वन परिक्षेत्रातील अमिर्झा बिटात विद्युत प्रवाहद्वारे वाघाच्या शिकारप्रकरणी वन विभागाने संशयित सहा आराेपींना अटक करण्यात आली आहे. अमिर्झा गावालगतच्या जंगलातील कंपार्टमेंट नं. ४१७ मध्ये जिवंत विद्युत तारेद्वारे वाघाची शिकार करण्यात आली हाेती. ही घटना २४ ऑक्टाेबर राेजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

वन विभागाने चाैकशी अधिकारी नेमून या घटनेची सविस्तर चौकशी सुरू करण्यात आली. दरम्यान, २६ ऑक्टाेबर राेजी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सहा संशयित आरोपींना अटक करण्यात आली. यात प्रमोद मनोहर मडावी (२९), सुनील केशव उसेंडी (२८), दिलीप ऋषी उसेंडी (२८), प्रकाश दयाराम हलामी (४२), चेतन सुधाकर अलाम (२५) सर्व राहणार मरेगाव टाेली व नीलेश्वर शिवराम होळी रा. मोहटोला ता. जि. गडचिरोली आदी आराेपींचा समावेश आहे.

nagpur woman filed rape charges against future husband
तरुणीची भावी पतीविरुद्ध बलात्काराची तक्रार…साक्षगंध होताच……
pune marathi news, pune bail marathi news
पुणे: बनावट कागदपत्रे तयार करून जामीनदार उभा करणे अंगलट; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
Gautam Navlakha
नजरकैदेत ठेवण्याची मागणी गौतम नवलखांना पडली भारी; एनआयएनं दिलं १.६४ कोटींचं बिल
police case marathi news, prithvi shaw marathi news
‘पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश द्या’, पृथ्वी शॉविरोधात गुन्हा न नोंदवल्याचे प्रकरण

हेही वाचा… “उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाची माफी मागितली पाहिजे”, सुधीर मुनगंटीवारांची मागणी

आरोपींविरुद्ध वन गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सदर प्रकरणाची चौकशी गडचिराेली वन विभागाचे उपवनसंरक्षक मिलिश दत्त शर्मा यांच्या मार्गदर्शनात चौकशी अधिकारी तथा सहायक वनसंरक्षक (जंकास) संकेत वाठोरे हे करीत आहेत.

आराेपींकडून वाघाचे अवयव जप्त

वन विभागाने अटक केलेल्या सर्व आराेपींकडून मृत वाघाचे पायाचे पंजे, नखे, दात व शिकारीसाठी वापरलेले अवजार कुऱ्हाड, सुरा आदी साहित्यसुद्धा जप्त करण्यात आले. या प्रकरणात सखाेल चाैकशी सुरू असून, आराेपींनी आणखी किती शिकारी केल्या याबाबतसुद्धा उलगडा केला जात आहे.