चंद्रपूर : वनपरिक्षेत्र कोठारी अंतर्गत येत असलेल्या उपवनक्षेत्र करंजीमधील बोरगाव येथे एका शेतात वीजप्रवाह सोडून चार जणांनी चितळाची शिकार केली. पण मांसाची विल्हेवाट लावताना चौघेही वनविभागाच्या जाळ्यात अडकले. यांच्याकडून चितळाचे मांस व शिकारीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

हेही वाचा >>> यवतमाळ : खड्डयांनी घेतला तरुण-तरुणीचा बळी!, ट्रक आणि कारचा भीषण अपघात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बोरगाव येथील सत्यविजय घागरू जीवने यांच्या शेतात चितळाची शिकार करण्यात आल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाली होती. त्या आधारे वनविभागाने तेथे छापा टाकला. चारही आरोपी चितळाच्या मांसाची विल्हेवाट लावताना दिसून आले. शोधमोहिमेनंतर चितळाचे मांस, हाडे, शिकारीच साहित्य जप्त करण्यात आले आहे. मनोज रामू संदावार (३५), वैभव सत्यविजय जीवने (४२), प्रितम सिद्धार्थ मुंजमकार (३७), एकनाथ रामगिरकार (३४) रा. बोरगाव यांना वन्यजिव संरक्षण अधिनियम अन्वये अटक करण्यात आली. सदरची कारवाई वनपरिक्षेत्राधिकारी मुरकुटे, क्षेत्रसहायक पेदपल्लीवार यांच्या पथकाने केली.