वस्तीतील मुलांसोबत बोलताना दिसल्यामुळे वडिलांनी १६ वर्षांच्या मुलीला रागावले. त्यामुळे मुलीने मैत्रिणीला सोबत घेऊन घरातून पळ काढला. पोलिसांत तक्रार होताच खळबळ उडाली. गुन्हे शाखेच्या ‘एएचटीयू’ पथकाने दोन्ही मुलींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले आणि कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.

हेही वाचा >>>नागपूर : विदर्भातील मत्स्यव्यवसायाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज – मुनगंटीवार

Millions of online bets on IPL in gadchiroli
गडचिरोली : ‘आयपीएल’वर कोट्यवधीचा ऑनलाईन सट्टा!
couple confessed to murdering the girl as they could not take care of it
मुलीचा सांभाळ करता येत नसल्याने केली हत्या, दाम्पत्याची कबूली
Nagpur, boy died, electric shock,
नागपूर : विजेच्या धक्क्याने नऊ वर्षांचा मुलगा ठार
Girl organ donation
शेतमजूर कुटुंबाचा धाडसी निर्णय; मुलीच्या अवयवदानातून…

हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी १६ वर्षीय मुलगी रिया (काल्पनिक नाव) दहावीची विद्यार्थिनी आहे. ती २६ ऑक्टोबरला एका मुलाशी बोलताना वडिलांना दिसली. त्यामुळे वडिलांनी तिच्यावर आरडाओरड केली. तिने शेजारी राहणारी १७ वर्षीय मैत्रीण हिला वडील रागावल्यामुळे घर सोडण्याचा निर्णय सांगितला. तिला मैत्रिणीने गुजरात जाण्याचा सल्ला दिला. रियाने मैत्रिणीलाही घर सोडण्यास प्रवृत्त केले. दोघींनी घरातील काही पैसे घेतले आणि २७ ऑक्टोबरला रेल्वेने अहमदाबादचे तिकीट काढले. तेथे पोहचल्यानंतर दोघीही घाबरल्या. त्यांनी कुटुंबियांना फोन केला.

हेही वाचा >>>नागपूर : जिल्हा परिषदेत आज काँग्रेसची परीक्षा, सभापतीपदाच्या निवडणुकीत चुरस

पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनात एचटीयूच्या प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक रेखा, गजानन चांभारे यांनी लगेच तांत्रिक पद्धतीने दोघींचाही शोध घेतला. त्यांनी वस्त्रपूर पोलीस ठाण्यात माहिती देऊन मुलींना ताब्यात घेतले. पोलीस हवालदार नाना ढोके, सुनील वाकडे, शरीफ शेख आणि आरती चौहाण हे पथक अहमदाबादला गेले आणि मुलींना ताब्यात घेतले. त्यांनी लगेच कुटुंबीयांच्या ताब्यात दिले.