वर्धा : वडलांची खूनशी वृत्ती व व्यसनाधीनता यास त्रस्त होवून मुलानेच त्यांचा खून केल्याचे रहस्य चार दिवसांनी पुढे आले आहे. वडनेर पोलीस हद्दीत आजनसरा येथील ही घटना आहे.

अरुण गुलाबराव काचोळे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते सात नोव्हेंबरला शेतात जात असल्याचे घरून सांगत रात्री निघाले होते. मात्र नंतर घरी आलेच नाही. शेवटी त्यांचा मृतदेहच विहिरीत आढळून आला. शेतमजुराने ही माहिती मुलगा विनोद यास कळविली. अरुण काचोळे हे व्यसनाच्या आहारी गेले होते. दारूचा अमल असतानाच ते तोल जात विहिरीत पडले, अशी तक्रार विनोदने पोलिसांकडे नोंदविली. मात्र हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय आल्याने पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला.

हेही वाचा – दिवाळीच्या रोषणाईमुळे वीज वापरात वाढ, पण ‘या’ कारणाने वीज मागणी स्थिर

हेही वाचा – यवतमाळ : जिल्ह्यातील ५९ हजार शेतकऱ्यांची दिवाळी गोड, खात्यात ४१ कोटींचा अग्रीम पीक विमा जमा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अखेर मुलगा विनोद याच्यापाशी तपास थांबला. काचोळे हे नशेत होते त्या दिवशी विनोद व त्याचा मित्र नितेश मनोहर चाफले हे दोघे दुपारीच शेतात पोहोचले. विहिरीजवळ असणाऱ्या काचोळे यांच्या डोक्यात पाईपने वार केले. त्यात ते ठार झाल्यावर मृतदेह विहिरीत टाकून दिला. काचोळे हे नशेत सर्वांना शिवीगाळ करायचे. शेतीचे पैसे घरी देत नव्हते. म्हणून खून केल्याची कबुली विनोदने दिली.