अकोला: २८ ऑक्टोबरच्या रात्री होणारे खंडग्रास चंद्रग्रहण संपूर्ण भारतातून बघता येणार आहे. सुमारे सव्वा तास नुसत्या डोळ्यांनी चंद्रग्रहण पाहता येईल, अशी माहिती विश्वभारती केंद्राचे संचालक प्रभाकर दोड यांनी दिली.

सूर्य आणि चंद्र यामध्ये पृथ्वीच्या सावलीत चंद्र आल्याने काही कालावधीपर्यंत चंद्रबिंब काही अंशी आपण पाहू शकत नाही. हा एक नैसर्गिक सावल्यांचा खेळ आहे. शनिवारी मध्यरात्रीनंतर पश्चिम आकाशात वरच्या भागात रात्री १.०५ वाजता ग्रहणाला प्रारंभ होऊन उत्तर रात्री २.२३ वाजता खगोलिय घटनेचा शेवट होईल. हा आकाश नजारा आशिया, युरोप, ऑस्ट्रेलिया व पूर्व अमेरिका यातील काही भागात बघता येईल.

हेही वाचा… घरी परत येतो म्हणून सांगून गेलेल्या तरुणाचा मृतदेहच आढळला, पुसद येथे गळा आवळून तरुणाचा खून

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आकाशातील राशीचक्रातील पहिल्याच राशीत अश्विनी नक्षत्राजवळ चंद्र झाकला जाईल. याच राशी समुहात सध्या सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह असल्याने अश्विनी, गुरु ग्रह व छायांकीत चंद्र असा त्रिकोण बघता येईल. मराठी चांद्रमासात प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी चंद्र ठराविक नक्षत्रात असतो. या आश्विन पौर्णिमेला अश्विनी नक्षत्रात मेष राशीत असेल, असे प्रभाकर दोड यांनी सांगितले. आकाशातील अनेक घडामोडी फार आकर्षक व मनमोहक असतात. त्याचा आनंद घेण्याचे आवाहन त्यांनी केले.