नागपूर : नागपूरमध्ये पार पडलेल्या दोन दिवसीय सी-२० परिषदेत देशविदेशातील महिलांचा सहभाग लक्षणीय ठरला. परिषदेला उपस्थित भारतासह २६ देशांच्या एकूण ३५७ प्रतिनिधींपैकी तब्बल १६४ महिला होत्या. विशेष महत्त्व सी-२० समितीच्या अध्यक्षा सुध्दा एक महिला माता अमृतानंदमयी होत्या. नागरी समाज संघटनांच्या प्रतिनिधीसाठी विविध मुद्यांवर चर्चा करण्यासाठी सी-२० हा जागतिक मंच ठरला. या पार्श्वभूमीवर परिषदेतील महिलांचा सहभाग महत्त्वाचा ठरतो. त्याच प्रमाणे स्रीपुरूष असमानता बाद ठरवणारा आणि निर्णय प्रक्रियेतील महिलांचे वाढता सहभाग अधोरेखित करणारा ठरतो.. नागपुरातील सी-20 परिषदेत सिव्हील सोसायटीच्या अध्यक्ष माता अमृतानंदमयी यांच्यासह उल्लेखनीय सहभाग नोंदविलेल्या महिलांमध्ये अमेरिका येथील क्लिंटन हेल्थ ऍक्सेस इनिशियेटिव्हच्या डॉ. अँडी कार्मोन, ट्रॉयका सदस्य आणि ब्राझिलमधील गेस्टोसच्या अलेक्झांड्रा निलो, नेदरलँड येथील पर्यावरण तंत्रज्ञानाच्या अभ्यासक डॉ. मेर्ले डे क्रुक, इंटेल कॉर्पोरेशनच्या संचालक ॲलिसन लेन रिचर्डस, आयसीपीसी ग्लोबल फाउंडेशनच्या विकास संचालक वेर्निका सोबोलेवा, स्वामी विवेकानंद केंद्राच्या उपाध्यक्ष तथा सी-२० सुकाणू समितीच्या सदस्य निवेदीता भिडे, पीपल्स वर्ल्ड कमिशन ऑन फ्लड अँड ड्रॉउट या संस्थेच्या आयुक्त इंदिरा खुराना, डॉ. प्रिया नायर, अमृता विश्वविद्यापीठमच्या डॉ. मनीषा सुधीर, सत्संग फाउंडेशनच्या राष्ट्रीय समन्वयक वासुकी कल्याणसुंदरम आदिंचा समावेश होता.