वाशिम: अनेकजण महागडी विदेशी दारू पितात. मात्र, हल्ली विदेशी दारू बनावट असल्याचे आढळून येत असल्याने अनेकांना गंभीर आजार उद्भवत आहे. मंगरूळपीर तालुक्यातील तऱ्हाळा परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाने २५ ऑक्टोंबर रोजी सापळा रचून ६ लाख ८० हजार १६६ रुपयांची बनावट विदेशी दारू जप्त केली आहे.

प्राप्त माहितीनुसार हुंदाई कंपनीची चार चाकी गाडी क्रमांक एम एच ४३, ए आर ३३१८ मंगरूळपीर तालुक्यातील तऱ्हाळा परिसरातून जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळताच सापळा रचून गाडीची तपासणी केली असता, वाहनातून बनावट विदेशी दारू रॉयल स्टाँग च्या सीलबंद बाटल्या, बनावट एम्पेरियल ब्लू व्हिस्कीच्या बाटल्या, बॉम्बे रॉयल व्हीसकीच्या बाटल्या गोवा राज्यात विक्रीस असलेल्या परंतु राज्यात प्रतिबंधित असलेल्या विदेशी मद्य व बनावट विदेशी दारू तयार करण्यासाठी लागणारे झाकणे, लेबल व रिकाम्या बाटल्या असा एकूण ६ लाख ८० हजार १६६ रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी नितेश फुलसिंग राठोड, साबरसिंग जाधव बार्शी टाकळी जिल्हा अकोला यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आली असून पुढील तपास गोपीनाथ पाटील हे करीत आहे.

हेही वाचा… यापुढे एकाही दारू दुकानाला परवानगी दिली तर याद राखा; मुनगंटीवार यांनी खडसावले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक गोपीनाथ पाटील, सुरेश चव्हाण दुय्यम निरीक्षक के डी वराडे, कांबळे, वाक पांजर, निवृत्ती तिडके, स्वप्नील लांडे, बाळू वाघमारे, नितीन चीपडे,दीपक राठोड, ललित खाडे, विष्णू मस्के, दीपक वाईकर, संजय मगरे आदींचा समावेश होता.