नागपूर : वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाच्या विद्यार्थ्याला विश्वविद्यालयाविरोधात समाज माध्यमावर पोस्ट टाकणे चांगलेच अंगलट आले आहे. विश्वविद्यालयाने बडतर्फ केल्याने परिक्षेपासून मुकण्याची वेळ आल्याने विद्यार्थ्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

विवेक मिश्रा, असे या विद्यार्थ्यांचे नाव असून तो हिंदी विश्वविद्यालयात थिएटर्स अँड ड्रामाटीक्स या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहे. न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्या. अभय मंत्री यांच्या समक्ष या प्रकरणावर सुनावणी झाली. विवेक यांच्या विश्वविद्यालयासंदर्भात वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा आरोप आहे. या आरोपामुळे २७ जानेवारी २०२४ रोजी त्याला विश्वविद्यालयातून बडतर्फ करण्यात आले. ही कारवाई मागे घेण्यात यावी म्हणून त्यांनी कुलसचिवांना निवेदन दिले. या निवेदनात मी असे कुठलेही कृत्य केले नसल्याचा उल्लेख त्याने केला आहे. बडतर्फ करण्यापूर्वी आपली बाजू ऐकून घेण्याची संधी देण्यात आली नाही. २७ जानेवारी रोजी त्यांना हॉस्टेलमधूनही काढण्यात आले, असाही आरोप त्यांनी याचिकेतून केला आहे.

हेही वाचा – बावनकुळे म्हणतात, “कुणी सोबत येत असेल तर भाजपचा दुपट्टा तयार, राहुल गांधी…”

हेही वाचा – “संधी दिल्यास भाजपकडूनच लढणार”, उदयनराजे भोसले म्हणतात, “श्रीनिवास पाटील हे वयाने…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या विरोधात त्यांनी विश्वविद्यालय परिसरात १ फेब्रुवारीपासून उपोषण सुरू केले होते. ७ फेब्रुवारीला त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्याला प्रथम वर्धा येथील जिल्हा रुग्णालयामध्ये तर ९ फेब्रुवारीला नागपुरातील मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. १० फेब्रुवारीला त्यांना मेडिकलमधून सुटी देण्यात आली. रुग्णालयामध्ये असतानाच ७ फेब्रुवारीला विश्वविद्यालयातून त्याला कायमचे काढून टाकण्यात आले. दुसरीकडे ९ फेब्रुवारीपासून त्यांची परीक्षा सुरू झाली. त्यामुळे विवेक यांनी उच्च न्यायालयात घाव घेतली. न्यायालयाने परीक्षेला बसू देण्याचे आदेश देत कुलगुरू व कुलसचिवांना नोटीस बजावून २२ फेब्रुवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश दिले.