बुलढाणा : ‘हॉट स्पॉट’ असलेले चंद्रपूर तापमानाचे दररोज नवनवीन विक्रम स्थापन करीत असताना ‘कुल कुल’ असलेल्या बुलढाणा शहरातील तापमान चाळीस डिग्रीच्या घरात पोहोचले आहे. ऊन आणि गर्मीमुळे शहरवासी त्रस्त आहेत.

मध्यंतरी अवकाळी पावसामुळे शहरासह जिल्ह्यात काही दिवस पावसाळासदृश्य वातावरण होते. मात्र ‘यलो अलर्ट’ ची मुदत संपल्यावर आता डोक्यावरील सूर्य आग ओकत असल्याचा भास बुलढाणेकरांना होऊ लागला आहे. एप्रिल मध्यापूर्वीच बुलढाण्याचा पारा चाळीसच्या घरात पोहोचला आहे.

हेही वाचा – “कहीं हम भूल न जायें” चंद्रपुरात १८ तास निरंतर अभ्यास उपक्रमाने महामानवास अभिवादन

११ एप्रिलला बुलढाण्याचे तापमान ३९. २ डिग्री इतके होते. बारा तारखेला ३८.४ डिग्री, तेराला ३८.४, चौदाला ३९ डिग्री तर काल, शुक्रवारी ३८.४ डिग्री तापमानाची नोंद झाली. आज हा पारा पुन्हा चाळीसच्या घरात पोहोचला! यामुळे येत्या आठवड्यात हा आकडा चाळीशी पार करण्याची दाट शक्यता आहे.

हेही वाचा – अमरावती : ‘‘तेरा फोटो देखके मेरा दिल आया है, आय लव्ह यू..’’ म्हणत बँकेच्या महिला अधिकाऱ्याचा विनयभंग‎

विषम तापमानामुळे वाढले आजार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसरीकडे कमाल तापमानाच्या तुलनेत शहर परिसरातील किमान तापमान मात्र १९ ते २५.४ डिग्रीच्या दरम्यान रेंगाळत आहे. आज १९ डिग्री किमान तापमानाची नोंद झाली. कमाल ४० च्या आसपास, तर किमान २५ च्या खाली अशा विषम तापमानामुळे किरकोळ आजारांचे प्रमाण वाढले आहे. लहान मुले व वृद्ध यांच्यासाठी हे विषम तापमान धोकादायक ठरत आहे.