नागपूर: साडी नेसण्यामागे शास्त्रीय कारण आहे हे ऐकून थोडे आश्चर्य वाटेल, तसेच याबद्दल जाणून घेण्याची इच्छा झाली असेल तर चला मग याबद्दल सविस्तर वाचा. कालांतराने पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव वाढल्याने आज बहुतांश स्त्रियांनी साड्या नेसणे सोडून दिले आहे. असे असले तरी
साडी हा पृथ्वीवरील सर्वात जुना पोशाख आहे आणि भारतात असे मानले जाते की साडी एका स्त्रिला परिपूर्ण करते.

अनेकांच्या म्हणण्याप्रमाणे साडीत त्यांना आरामदायक वाटत नाही किंवा काम करताना चालताना समस्यांना तोंड द्यावे लागते. पण असे असले तरीदेखील अनेकांना हे माहीत नाही की साडी नेसण्याची वैज्ञानिक कारणेदेखील आहेत. जे महिलांसाठी फायद्याचे आहेत.

हेही वाचा – गोंदिया जिल्ह्यात हेल्मेटसक्ती लागू होणार; वाहतूक विभागाला उशिरा सुचलेलं शहाणपण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

साडी नेसल्याने तुम्ही त्याचा पदर ज्या शैलीत बांधता त्यानुसार तुमच्या शरीराचे तापमान वेगवेगळ्या प्रकारे नियंत्रित करता येते. साडी आपल्या सर्व इंद्रियांना निरोगी ठेवते. असे मानले जाते की ज्या पद्धतीने साडी नेसली जाते, त्यामुळे शरीरातून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते आणि व्यक्तीचे मन, आत्मा आणि शरीर निरोगी आणि आनंदी होते. हे कोणत्याही पाश्चात्य सैल कपड्यांप्रमाणेच शरीराला थंड ठेवण्यास मदत करते. अशाप्रकारे शरीराचे तापमान बदलू शकणारे वस्त्र हे अतिशय गतिमान वस्त्र आहे.