scorecardresearch

नागपूर : प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यावर कारवाई करा, लहू सेना आक्रमक

अभिनेते महेश मांजरेकर यांच्या विरुद्ध स्थानिक लहू सेनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून निवेदन पाठवून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.

Lahu Sena Nagpur
प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यावर कारवाई करा, लहू सेना आक्रमक (image – लोकसत्ता टीम/ग्राफिक्स)

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक व अभिनेते महेश मांजरेकर यांच्या विरुद्ध स्थानिक लहू सेनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून निवेदन पाठवून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.

हेही वाचा – नागपूर : नववीची विद्यार्थिनी सहा महिन्यांची गर्भवती, प्रियकराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल

हेही वाचा – नागपूर शिक्षक मतदारसंघात मविआ विरुद्ध वंचित, सेनेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

प्रकरण एका खाजगी दूरचित्रवाणी वाहिनीवर सुरू असलेल्या वेबसिरीजमधील दृश्याशी संबंधित आहे. या वेबसिरीजमधील एका विवाह समारंभाच्या दृश्यात बॅण्ड पथकातील सदस्यांविषयी मांजरेकर यांच्या तोंडी आक्षेपार्ह संवाद आहे. हा प्रकार बॅण्ड पथकात वाद्य वाजवून उपजीविका करणाऱ्यांचा अपमान आहे. वाद्य वाजवणे हा व्यवसाय आहे. विवाह समारंभासारख्या मंगल प्रसंगात त्यांना वाद्य वाजवण्यासाठी बोलून कार्यक्रमाची शोभा वाढवली जाते. मात्र वेबसिरीजमधील दृश्यात बॅण्ड पथकाच्या संदर्भात मांजरेकर यांच्या तोंडी असलेल्या संवादाने महाराष्ट्रात हे काम करणाऱ्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असा आरोप लहू सेनेचे प्रमुख संजय कठाळे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात केला आहे व मांजरेकर यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. उपजिल्हाधिकारी श्रीमती बनकर यांना हे निवेदन देण्यात आले आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-01-2023 at 10:53 IST
ताज्या बातम्या