लोकसत्ता टीम

चंद्रपूर: गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावत आहे. काल मंगळवारी वेकोलीच्या माजरी क्षेत्रातील नागलोन खाण परिसरात ओव्हर बर्डनची वाहतूक करणाऱ्या बाबु धनकुमार महेंद्र सिहं या कर्मचाऱ्याचा अंगावर वीज कोसळली. हा थरारक प्रसंग व घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

जिल्ह्यात मंगळवारी वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू असताना दुपारी अडीच वाजताच्या सुमारास ओसी टु नागलोण खाण परिसरात बाबू धनकुमार महेंद्र सिंह हा खाणीत काम करीत होता. आज तो खाणीतील ओवर बर्डनची वाहतूक करीत होता.

आणखी वाचा- नागपूर: पुन्हा अवकाळी, गारपीट

दरम्यान, अचानक वादळ सुरु झाले. त्यानंतर वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. तो चालत असताना त्याचा अंगावर वीज कोसळली. यात त्याचा घटनास्थळी दुर्दैवी मृत्यू झाला. सदर कर्मचारी मुळचा बिहार राज्यातील आहे. त्याच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती कळविण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या घटनेची माहिती मिळताच माजरी पोलिसांनी घटनास्थळ गाठले. मृतक बाबू धनकुमार महेंद्र सिहं हा माजरी खाणीतील के. जी. सिंग कंपनीत कर्मचारी होता.