राखी चव्हाण
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरेगावच्या जंगलात कोरंबी गावाजवळ शनिवारी सकाळी रेल्वे रुळावर वाघाचा मृतदेह आढळून आला.
लाखांदूर येथे चार लोकांचा बळी घेणारा हाच वाघ असावा, अशी शंका सुरुवातीला व्यक्त करण्यात आली. कारण याच परिसरात सीटी-१ या वाघाची भ्रमंती सुरु होती. मात्र, हा तो वाघ नसून नवीन असल्याचे स्पष्ट झाले. याच परिसरात आणखी एका मोठ्या वाघाचे वास्तव्य आहे.
सकाळी नऊ वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. गोंदिया-नागभीड-चंद्रपूर व्हाया वडसा असा हा रेल्वे मार्ग आहे. दोन वर्षांपूर्वी याच मार्गावर वाघाच्या बछड्याचा मृत्यू झाला होता. त्याआधी देखील दोन वाघ याठिकाणी मृत्युमुखी पडले होते.