कोका वन्यजीव अभयारण्यात २६ मार्च रोजी  वाघाचा मृत्यू झाला होता. त्याचा शवविच्छेदन अहवाल वनविभागाला प्राप्त झाला असून त्यात नमुद केल्याप्रमाणे विषबाधा झाल्याने वाघाचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले आहे. या घटनेतील दोन आरोपींना अटकही करण्यात आल्याचे वन विभागाने  म्हटले आहे. या घटनेचा तपास सहाय्यक वनसंरक्षक रोशन राठोड, कोका वन्यजीव अभयारण्य व महादेव माकडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, यांनी करून २९ मार्च २०२३ रोजी दोन संशयित आरोपीस अटक केली.

हेही वाचा >>> ‘त्या’ शावकांच्या नैसर्गिक अधिवासाच्या दिशेने प्रवास सुरू

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
Emphsises on right to be free from the adverse effects of climate change
“नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण काय आहे?
Boy killed for resisting unnatural act Sheel Daighar police arrests two
अनैसर्गिक कृत्यास विरोध केल्याने मुलाची हत्या, शीळ डायघर पोलिसांनी केली दोघांना अटक
Mukhtar Ansari death
कुख्यात गुंड मुख्तार अन्सारीच्या तुरुंगात मृत्यूनंतर न्यायालयीन चौकशीचे आदेश

नरेश गुलाबराव बिसने, वय ५४ वर्ष रा. परसोडी, ता. लाखनी जि. भंडारा व मोरेश्वर सेगो शेंदरे, वय ६४ वर्ष रा. परसोडी, ता. लाखनी जि. भंडारा अशी आरोपींची नावे आहेत.  ३० मार्च रोजी वशिष्ठ गोपाल बघेले वय ५९ वर्ष रा. खुर्शीपार पो. सालेभाटा, ता. लाखनी जि. भंडारा यांना  चौकशीसाठी कोका वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात पाचारण करण्यात आले होते.  बघेले हे सुध्दा या प्रकरणात सहभागी असल्याने त्यांना सुध्दा अटक करण्यात आली. आरोपींकडून नखे- ६ नग हस्तगत करण्यात आले. 

हेही वाचा >>> महाराष्ट्रातील तरुण संशोधकांनी केरळच्या समुद्रकिनारी पालीच्या नव्या निशाचर प्रजातीचा लावला शोध

या प्रकरणात जयरामेगौडा आर, उपवनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक, नवेगांव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र गोंदिया, पवन जेफ, उपसंचालक, नवेगांव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र साकोली, रोशन राठोड, सहाय्यक वनसंरक्षक (अति.कार्य.) कोका वन्यजीव अभयारण्य यांच्या मार्गदर्शनात तसेच संजय मेंढे, वनपरिक्षेत्र अधिकारी, गस्ती पथक वनविभाग भंडारा, सचिन नरळ, वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या सहकार्याने पुढील तपास व आवश्यक कार्यवाही महादेव माकडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, कोका वन्यजीव अभयारण्य व इतर क्षेत्रीय कर्मचारी करीत आहेत.