चंद्रपूर : लगतच्या गडचिरोली जिल्ह्यातून सावली वनपरिक्षेत्रातील व्याहाड खुर्द उपवन परिक्षेत्रातील उपरी व शिर्शी वन बिटातील उपरी, डोनाळा, हरंबा शेतशिवरात हत्ती व वाघाने धुमाकूळ घातला आहे.हत्तींमुळे धान पिकाचे मोठे नुकसान होत असून वाघ या परिसरात दोन दिवसांपासून जंगल परिसराला लागून असलेल्या शेत शिवारात येत असल्याने भीतीचे वातावरण आहे.

गडचिरोलीतील हत्ती पाच दिवसांपासून या परिसरात भटकत आहे. हरंबा येथे हत्ती वैनगंगा नदी काठावरील एका बोटी चे नुकसान केले आहे. काही शेतकऱ्यांचे शेती व साहित्याचे नुकसान केले आहे. शनिवार १२ ऑगस्ट रोजी रात्री ७ वाजताच्या सुमारास हत्ती डोनाळा येथील प्रवासी निवाराच्या बाजूने शेत शिवारात जात असताना तेथे उपस्थित नागरिकांनी पाहिले आणि  मोबाईलमध्ये फोटो घेतली. ही माहिती वनविभागास कळविली.

हेही वाचा >>> पूर : स्पेनच्या तुलनेत भारतात अत्यल्प अवयवदान – प्रा. डॉ. टॉम चेरियन यांची माहिती

सकाळी ७ वाजताच्या दरम्यान डोनाळा येथील रहिवासी प्रकाश मानकुजी मेश्राम (४५) हा शेताकडे धान पिकाचे शेतीला पाणी करण्यासाठी गेला असता त्याचे समोरासमोर अगदी दहा फूट अंतरावर वाघ दिसला . त्या शेतकऱ्याने लगेच दुसऱ्या बाजूने पळ काढला आणि आपला जीव मुठीत घेऊन गावात आला. 

सदर घटनेची माहिती व्याहाड खुर्द उपवन परिक्षेत्राचे क्षेत्र सहाय्यक सूर्यवंशी व बिट वनरक्षक सोनेकर यांना देण्यात आली.  घटनेची माहिती मिळताच संबंधित अधिकारी  डोनाळा येथे दाखल झाले. त्यांनी वाघाच्या हल्ल्यातून बचावलेल्या प्रकाश माणकुजी मेश्राम यांची भेट घेतली आणि विचारपूस केली. तेव्हा प्रकाशने कोणतीही इजा झाली नाही असे सांगितले. त्या  नंतर डोनाळा शेतशिवारातील हत्ती ज्या मार्गाने शेतकऱ्यांच्या शेतातून गेला त्याचा मागोवा घेत शोधमोहीम सुरू केली आहे.

हेही वाचा >>> गर्भवती मातांचा असाही एक ‘रॅम्प वॉक शो’!

जवळपास पाच सहा दिवसापासून या वन परिक्षेत्रात हत्तीने धुमाकूळ घातला असून शेतीचे मोठे नुकसान होत आहे तर दुसरीकडे वाघ हा गावाशेजारी फिरत असल्याने नागरिकांमध्ये भीती आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गडचिरोली जिल्ह्यातील हत्ती आरमोरी जवळील वैनगंगा नदी पार करून मुडझा मार्गे पाथरी , गायडोंगरी, केरोडा, व्याहाड, उपरी, हरांबा, काढोली, डोनाळा इत्यादी गावातील शेतशिवरात भटकत आहे. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभाग प्रयत्न करीत आहे.-रवी.एम. सूर्यवंशी,क्षेत्र सहाय्यक उपवन परिक्षेत्र व्याहाड खुर्द