नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील वाघांच्या अनेक कथा समाजमाध्यमावर येतात, पण राज्यातील इतर अभयारण्यातील वाघांच्या कथाही तेवढ्याच प्रसिद्ध आहेत. अलीकडच्या काही वर्षात यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यात वाघांची संख्या वाढत आहे. मनुष्यबळीचा ठपका ठेऊन मारण्यात आलेली ‘अवनी’ वाघीण जेवढी प्रसिद्ध होती, तेवढीच आता ‘फोर मार्क’ नावाची वाघीण टिपेश्वर अभयारण्यात पर्यटकांना आकर्षित करत आहे. सुमारे बारा वर्षाची ही वाघीण अलीकडेच तिच्या तीन बछड्यांसह आढळली. त्यांच्यातील हा प्रेमाचा बंध हैदराबाद येथील वन्यजीव छायाचित्रकार दीपक सीवन यांनी अचुक टिपला.
‘फोर मार्क’ या वाघिणीचा जन्म २०१३ सालचा. तिच्या गालावर चार आकड्यासारखी खूण असल्याने तिला ‘फोर मार्क’ हे नाव देण्यात आले. टिपेश्वर अभयारण्यातीलच ‘पीलखान’ ही सर्वाधिक वयाची वाघीण आणि तिचीच ही मुलगी. टिपेश्वर अभयारण्यातून आतापर्यंत अनेक वाघांनी स्थलांतर केले आहे. स्थलांतरणानंतर हे वाघ या अभयारण्यात परत आले नाहीत. मात्र, ‘फोर मार्क’ या वाघिणीचे वैशिष्ट्य म्हणजे ती तेलंगणा, आदिलाबादपर्यंत स्थलांतर करते, पण आजतागायत या वाघिणीने कधी त्याठिकाणी मुक्काम केला नाही. एवढा लांबचा प्रवास करुनही ती परत टिपेश्वरमध्ये येते. त्यामुळे वन्यजीवप्रेमींची ती विशेष लाडकी आहे. आतापर्यंत पाचवेळा तिने मातृत्त्वाचा अनुभव घेतला आहे. ‘वॉकर-२’ हा स्थलांतर करणारा वाघही तिचाच बछडा. तर ‘जंजीर’ हा देखील तिचाच बछडा. पर्यावरण दिनाच्या काही दिवसाआधीच या वाघिणीचा तिच्या तीन बछड्यांसह सुंदर व्हिडिओ समोर आला आहे.
टिपेश्वरातील वाघांची वाढती संख्या आणि समृत्र होत चाललेले वन्यजीवन हेच आजचे खरे आकर्षण ठरत आहे. जे प्रत्येक वन्यजीव छायाचित्रकाराला इथे पुन्हा पुन्हा येण्यास भाग पाडते. एक निसर्गप्रेमी म्हणून आम्ही ‘पॉऊज ॲट टिपेश्वर’ हे रिसॉर्ट सुरू केले आहे. स्थानिकांना संधी देण्यासोबतच त्याच्या आर्थथ्क विकासासाठी एक नवा मार्ग उघडते. – दीपक सीवन
या हंगामात ‘फोर मार्क’ वाघीण आणि तिच्या तीन बछड्यांमुळे टिपेश्वरातील जंगल अनुभव अजूनच खास बनवला आहे. वाघांच्या वाढत्या संख्येमुळे वन्यजीव छायाचित्रकार आणि निसर्गप्रेमी मोठ्या संख्येने याठिकाणीआकर्षित होत आहे. आम्ही स्थानिक मार्गदर्शक आणि वाहनचालक म्हणून निसर्गप्रेमींना टिपेश्वरमध्ये येण्याचे मनापासून आमंत्रण देतो. – अनिल शेडमाके, पर्यटक मार्गदर्शक
‘फोर मार्क’ नावाची वाघीण टिपेश्वर अभयारण्यात पर्यटकांना आकर्षित करत आहे. सुमारे बारा वर्षाची ही वाघीण अलीकडेच तिच्या तीन बछड्यांसह आढळली. त्यांच्यातील हा प्रेमाचा बंध हैदराबाद येथील वन्यजीव छायाचित्रकार दीपक सीवन यांनी अचुक टिपला.
व्हिडीओ सौजन्य – वन्यजीव छायाचित्रकार दीपक सीवन… pic.twitter.com/6GSwrNNvcOThis quiz is AI-generated and for edutainment purposes only.— LoksattaLive (@LoksattaLive) June 5, 2025
‘पॉऊज ॲट टिपेश्वर’ या रिसॉर्टने आम्हाला हॉटेल व्यवस्थापनासारख्या नव्या क्षेत्रात कौशल्ये विकसित करण्याची संधी दिली. वैयक्तिक तसेच व्यावसायिक वाढीस मदत केली. या रिसाॅर्टचा मुख्य उद्देश स्थानिक लोकांचा आर्थिक व सामाजिक विकास आहे. १०० टक्के स्थानिकांना रोजगार देणे हे त्यांचे प्रमुख लक्ष्य आहे. – प्रवीण सूपर्ण, पर्यटक मार्गदर्शक