नागपूर: उपराजधानीतील प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) आणि वाहतूक पोलिसांच्या पथकाने सलग दुसऱ्या दिवशी, शुक्रवारी गणेशपेठ परिसरात चार खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाई केली. कारवाईच्या धसक्याने येथील अनेक ट्रॅव्हल्सच बेपत्ता झाल्याचे चित्र होते.

गणेशपेठ परिसरात एसटी महामंडळाचे मध्यवर्ती बसस्थानक आहे. त्यामुळे बसस्थानकाच्या २०० मीटर परिसरात खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांना बस पार्क करून प्रवासी घेता येत नाही.

हेही वाचा… एका कार्यक्रमाला जायचे असल्याने कपाट उघडले; हिऱ्याच्या हारासह साडेआठ लाखाचे दागिने गायब

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माजी महापौर संदीप जोशी यांच्या सूचनेनंतर आरटीओ व वाहतूक पोलिसांनी गुरुवारी या भागात ११ ट्रॅव्हल्सवर कारवाई केली होती. शुक्रवारीही आरटीओ आणि वाहतूक पोलिसांच्या पथकाने चार बसेसवर कारवाईही केली. खासगी ट्रॅव्हल्स परिसरात नसल्याने प्रवासी एसटीनेच प्रवासाला प्राधान्य देत असल्याचे चित्र होते.