यवतमाळ: नवीन मोटर वाहन कायद्याविरोधात ट्रक चालकांनी पुकारलेल्या आंदोलनाचा फटका वाहन चालकांना बसला आहे. इंधन मिळणार नाही या भीतीने वाहन चालकांनी सोमवारी दुपारपासूनच पेट्रोल पंपावर गर्दी केली. परिणामी अनेक पेट्रोलपंप रिकामे झाले असून, जिथे इंधन उपलब्ध आहे, अशा पंपांवर वाहनचालकांच्या रांगा लागल्या आहे.

तासनतास प्रतीक्षा रांगेत राहूनही इंधन मिळेल याची खात्री नसल्याने चाकरमाने हवालदिल झाल्याचे चित्र आहे. केंद्र शासनाच्या नवीन कायद्यानुसार दहा वर्षाची शिक्षा व मोठ्या दंडांची तरतूद आहे. शिवाय हा कायदा अजामिनपात्र आहे. या कठोर कायद्याविरोधात ट्रक चालकांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत आंदोलन पुकारले आहे.आंदोलनावर तोडगा निघाला नसल्याने ट्रक चालक संतप्त भावना व्यक्त करत आहे. या आंदोलनाचा परिणाम माल वाहतूकीसह इतर वाहतुकीवर होऊ लागला आहे.

हेही वाचा… चंद्रपुरातील निम्मे पेट्रोल पंप कोरडे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आज मंगळवारी सकाळपासून अनेक पेट्रोल पंपावर रांगा आहेत. वाहनचालकांची गर्दी झाल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.