बुलढाणा : क्षुल्लक कारणावरून बारा इसमानी एका कुटूंबात घरात शिरून सशस्त्र हल्ला केला. या भीषण हल्ल्यात एका युवक जागीच ठार झाला आहे.बुलढाणा जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील निवाना ( तालुका संग्रामपूर ) या गावात काल रात्री उशिरा ही घटना घडली आहे. प्रकरणी मध्यरात्री च्या सुमारास तामगाव पोलीस ठाणे येथे बारा आरोपीविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शुक्रवारी अखेर सर्वच्या सर्व म्हणजे १२ आरोपीना तामगाव पोलिसांनी अटक केली आहे.
या घटनेतील दोन्ही समुदाय आक्रमक समजल्या जात असल्याने व एकाची निर्घृण हत्या करण्यात आल्याने निवाना (तालुका संग्रामपूर) गावात तणाव निर्माण झाला आहे. हत्येचे पडसाद उमटू नये आणि दोन गटात संघर्ष होऊ नये म्हणून निवाना गावात काल मध्यरात्री पासूनच तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शुक्रवारी देखील गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आल्याचे चित्र आहे. तामगाव ठाणेदारासह पोलीस अधिकारी व कर्मचारी गावात तळ ठोकून आहे.
मंगररालसिंग जालमसिंग सोळंके (वय ५५ वर्ष),
जीवनसिंग झामसिंग सोळंके (वय ५२ वर्ष),
वैभव मोहनसिंग सोळंके (वय२२ वर्ष),
अमोल जीवनसिंग सोळंके (वय २७ वर्ष),
सुरज मंगलसिंग सोळंके( वय २८वर्ष),
आकाश मंगलसिंग सोळंके (वय २७ वर्ष),
ईश्वर उर्फ बारक्या मोहनसिंग सोळंके (वय २2 वर्ष),
मानसिंग विजयसिंग सोळंके ( वय ३० वर्ष),
राजेश विजयसिंग सोळंके (वय २३ वर्ष),
अजय घनश्याम पवार( वय १९ वर्ष),
दत्ता घनश्याम पवार( वय २२ वर्ष
महेश शिवहरी सोळंके( वय ३०वर्ष) अशी आरोपीची नावे आहे .सर्व आरोपी निवाणा (तालुका संग्रामपुर, जिल्हा संग्रामपूर) येथील रहिवासी आहे.या बारा जणांनी केलेल्या सशत्र हल्ल्यात ऋषीकेश सुभाष मोहे (वय २७ वर्ष राहणार निवाणा तालुका संग्रामपूर जिल्हा.बुलढाणा) असे ठार झालेल्या दुर्दैवी युवकाचे नाव आहे.
या बारा आरोपीनी हत्यारनिशी ऋषिकेश मोहे याच्या घरात घुसून ऋषिकेश व त्याच्या नातेवाईकांना यांना मारहाण केली. तुम्ही सोपान दिगंबर सोळंके याच्यावर असलेली विनयभंगाची केस मागे घ्या असे दरडावले. मात्र आज कोणत्याही परिस्थितीत याला संपवायचे या जिद्धीने त्यांनी ऋषिकेश सुभाष मोहे यास धारदार हत्याराने वार करून ठार केले. तसेच प्रज्ज्वल सुभाष मोहे व त्यांचे नातेवाईक यांना जिवे मारण्याची धमकी दिली. प्रज्ज्वल याने दिलेल्या यांनी दिलेल्या तोंडी तक्रारीवरून व वैध्यकीय प्रमाणपत्र वरून गुन्हा दाखल करण्यात आला. सदर घटनेचे गंभीर्य लक्षात घेता घटनेचा तपास तामगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार करीत आहे..
