नागपूर : उपराजधानीत घरोघरी डेंग्यू संशयित रुग्ण असून दोन संशयितांचा मृत्यू झाला आहे. शहरात बघता-बघता डेंग्यूग्रस्तांची संख्या तीनशे पार गेली असून हा आजार नियंत्रणात आणण्यात महापालिका अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे. पंधरा दिवसांत शहरातील सर्वेक्षणात २,८४३ घरात डेंग्यूच्या अळ्या सापडल्या आहेत.

महापालिकेतील आरोग्य विभागाच्या नोंदीनुसार, शहरात १ जानेवारी ते ३० ऑगस्ट २०२३ दरम्यान ३ हजार ९३ संशयितांची नोंद झाली. त्यापैकी ३०० जणांमध्ये डेंग्यूचे निदान झाले. बहुतांश रुग्ण हे गेल्या दीड ते दोन महिन्यांतील आहेत.

Why was business women Truong My Lan sentenced to death for corruption in Vietnam
भ्रष्टाचाराबद्दल उद्योजिकेला थेट फाशीची शिक्षा… व्हिएतनाममधील घटनेने जगभर खळबळ का उडाली? तेथे मृत्युदंडाचे प्रमाण इतके अधिक का?
A 16 year old girl was raped by five people Nagpur
नागपूर: १६ वर्षीय मुलीवर पाच जणांचा बलात्कार
india demand of land marathi news
कार्यालयीन जागांच्या मागणीत ४३ टक्के वाढ, पहिल्या तिमाहीत १.६२ कोटी चौरस फुटांचे व्यवहार; बंगळूरुचा सर्वाधिक वाटा
bank of Maharashtra loan disbursement increased by 16 percent
‘महाबँके’च्या कर्ज वितरणात १६ टक्क्यांची वाढ

हेही वाचा – पावसाने दडी मारल्याने विजेची मागणी २६ हजार मेगावॅटवर, वीज कंपन्यांची चिंता वाढली

सध्या दोन डेंग्यू संशयित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. परंतु एलायझा चाचणीनंतरच या मृत्यूचे खरे कारण पुढे येणार असल्याचा महापालिकेचा दावा आहे. वर्धा मार्गावरील पायनियर रेसिडेन्सी पार्क, सोमलवाडा येथेही एका तिसऱ्या डेंग्यू संशयित रुग्णाचा मृत्यू झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. हा रुग्ण एका खासगी रुग्णालयात दाखल होता. या रेसिडेन्सीमध्येही बरेच डेंग्यू संशयित रुग्ण आहेत. ही माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाला दिल्यावरही अद्याप येथे कुणीही पोहोचले नसल्याचे स्थानिक सांगतात. १७ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट २०२३ दरम्यान दहाही झोनमध्ये आरोग्य विभागाने १ लाख १४ हजार ८४९ घरांचे सर्वेक्षण केले. त्यापैकी २ हजार ८४३ घरात डेंग्यूच्या अळ्या वा डासांची उत्पत्ती आढळली. ही स्थळे नष्ट केल्याचा महापालिकेचा दावा आहे.

केवळ १० डेंग्यू तपासणी संच

घरोघरी रुग्ण असतानाही महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे केवळ १० डेंग्यू तपासणी संच आहेत. एका संचात सुमारे ९८ तपासण्या होतात. महापालिका प्रत्येक संशयितांची डेंग्यू तपासणी केली जात असल्याचा दावा करीत आहे. परंतु एवढ्या कमी संचात या सर्व तपासण्या शक्य आहेत काय, हा खरा प्रश्न आहे.

हेही वाचा – लोकजागर: ‘कवी’ गदरच्या निमित्ताने…!

महापालिका म्हणते, स्थिती नियंत्रणात…

महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल बुधवारच्या पत्रकार परिषदेत म्हणाल्या, पाऊस पडल्यानंतर बरेच दिवस उघाड राहते. हा काळ डेंग्यूला पोषक आहे. त्यामुळे रुग्ण वाढले. परंतु महापालिकेने तातडीने फवारणी, सर्वेक्षणासह उपचाराचे काम हाती घेतले. त्यामुळे आता स्थिती नियंत्रणात आहे. डेंग्यूच्या अळ्या आढळलेल्या ३०० घर मालक वा प्रतिष्ठान मालकाला नोटीस बजावल्या आहेत. ही कारवाई आणखी तीव्र होईल. या पत्रपरिषदेला महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, हिवताप व हत्तीरोग अधिकारी डॉ. मंजूषा मठपती, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी उपस्थित होते.

महापालिका रुग्णालयात एकही रुग्ण नाही

शहरात डेंग्यूचे तीनशेहून जास्त रुग्ण आढळले असून त्यापैकी अनेकांवर विविध शासकीय व खासगी रुग्णालयात दाखल करून उपचार केले गेले. परंतु महापालिकेच्या रुग्णालयात यावर्षी एकाही डेंग्यूग्रस्तावर उपचार झाले नसल्याचे महापालिकेने बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पुढे आले.